मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Settled on east side of Jordan

16 वचने · 21 पैलू

Settled on east side of Jordan बद्दल वचने

  1. त्यावेळी आपण काबीज केलेला प्रदेश मी रऊबेन व गाद यांच्या वंशास दिला. रऊबेन व गादच्या वंशांना मी आर्णोन नदीवरील अरोएरापासून गिलआद पर्वताचा अर्धा भाग त्यातील शहरांसह दिला.

  2. गिलआद पर्वताचा उरलेला अर्धा भाग आणि ओग राजाचे पूर्वीचे राज्य म्हणजे अर्गोब विभाग हा मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रास दिला. (बाशानच्या अर्गोब प्रदेशाला रेफाईमचा देश असेही म्हणत.

  3. मनश्शेहच्या वंशातील याईराच्या कुळाने गशूरी व माकाथी लोकांच्या सीमेपर्यंतचा अर्गोबचा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; त्याच्या नावावरून त्या प्रदेशाचे नाव पडले, त्यामुळे आजपर्यंत बाशानाला हव्योथ याईर म्हणतात.)

  4. आणि मी गिलआद देश माखीरला दिला.

  5. रऊबेन आणि गाद यांना मात्र गिलआद देशातील यब्बोक नदीपासून ते आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या मध्यापर्यंतचा सर्व भाग मिळाला. गिलआद ही अम्मोन लोकांची सीमा होती.

  6. तसेच किन्नेरेथाच्या समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र) आणि पिसगाच्या उतरणी खालील अराबा व यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशही त्यांनाच मिळाला.

  7. यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.

  8. मोशेने गाद गोत्रास त्यांच्या कुळानुसार हे वतन दिले:

  9. गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती.

  10. आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत;

  11. व खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती).

  12. ही नगरे व गावे गादच्या गोत्राला त्यांच्या कुळानुसार वतन म्हणून दिली होती.

  13. मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले:

  14. त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

  15. अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे).

  16. यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली.