मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Canaan divided amongst nine and a half of, by lot

5 वचने · 21 पैलू

Canaan divided amongst nine and a half of, by lot बद्दल वचने

  1. एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.

  2. याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते.

  3. अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते.

  4. योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.

  5. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली.