The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Under a president or chief
Under a president or chief बद्दल वचने
प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.
“तुम्हाला मदत करणार्या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;
जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;
योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;
बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;
दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;
आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;
गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;
नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.