मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Predictions respecting each of

49 वचने · 21 पैलू

Predictions respecting each of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “रऊबेना, तू माझा प्रथमपुत्र आहेस, माझे बळ, पौरुषाचे प्रथमफळ असा आहेस. प्रतिष्ठा आणि शक्तीत उत्कृष्ट असा तू आहेस.

  2. तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.

  3. “शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे.

  4. मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.

  5. त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन.

  6. “हे यहूदाह, तुझे भाऊ तुझी प्रशंसा करतील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील; तुझ्या पित्याचे पुत्र तुला नमन करतील.

  7. यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?

  8. यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.

  9. तो आपले गाढव द्राक्षवेलीला, गाढवीचे शिंगरू उत्कृष्ट द्राक्षवेलीला बांधून ठेवणार आहे; आपला झगा द्राक्षारसात, आपली वस्त्रे द्राक्षाच्या रक्तात धुणार आहे.

  10. त्याचे नेत्र द्राक्षारसापेक्षा गर्द होतील, त्याचे दात दुधापेक्षाही पांढरे होतील.

  11. “जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.

  12. “इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे.

  13. त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे, हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल आणि मजुरीचा दास होऊन जाईल.

  14. “दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.

  15. दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल व घोडेस्वार खाली कोसळेल.

  16. “हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.

  17. “एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.

  18. “आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.

  19. “नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.

  20. “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  21. कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.

  22. परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.

  23. कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्‍या झर्‍यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.

  24. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  25. “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”