मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने: Divided into families

48 वचने · 21 पैलू

Divided into families बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.

  2. रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ;

  3. हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ.

  4. ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.

  5. पल्लूचा पुत्र एलियाब होता,

  6. आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.

  7. ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते.

  8. तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही.

  9. शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;

  10. जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ.

  11. ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.

  12. गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: जेफोनपासून जेफोनी कूळ; हग्गीपासून हग्गी कूळ; शूनीपासून शूनी कूळ;

  13. ओजनीपासून ओजनी कूळ; एरीपासून एरी कूळ;

  14. अरोदपासून अरोदी कूळ; अरेलीपासून अरेली कूळ.

  15. ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली.

  16. एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.

  17. यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.

  18. पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.

  19. ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.

  20. इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ;

  21. याशूबपासून याशूबी कूळ; शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ.

  22. ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.

  23. जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: सेरेदपासून सेरेदी कूळ; एलोनपासून एलोनी कूळ; याहलीलपासून याहलेली कूळ.

  24. ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.

  25. योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते: