मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने

241 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो योसेफाबद्दल म्हणाला: “याहवेह स्वर्गातील मौल्यवान दवाने, आणि पृथ्वीच्या खोलात असलेल्या जलाने त्याच्या भूमीला आशीर्वादित करोत;

  2. सूर्यप्रकाशाने मिळणारे उत्तम उत्पादन, आणि चंद्राच्या प्रभावाने मिळणाऱ्या उत्तम गोष्टी त्याला प्राप्त होवो;

  3. प्राचीन पर्वतामधून प्राप्त होणार्‍या सर्वोत्तम वस्तूंनी आणि सनातन डोंगरातून मिळणार्‍या निवडक फळांनी भरून जावो;

  4. जी पृथ्वीच्या विपुलतेची सर्वोत्तम भेट, आणि जळत्या झुडूपातून बोलणार्‍या त्या प्रभूच्या कृपादृष्टीने तो समृद्ध होवो. योसेफाच्या व त्याच्या वंशजाच्या मस्तकावर हे सर्व आशीर्वाद येवोत, जो आपल्या भाऊबंदांत प्रमुख होता.

  5. प्रथम जन्मलेल्या बैलासारखे त्याचे वैभव आहे; त्याची शिंगे रानबैलाची शिंगे आहेत, त्या शिंगानी तो राष्ट्रांना, पृथ्वीच्या दिगंती असलेल्यांना देखील भोसकतो. एफ्राईमाचे लाखो वंशज आणि मनश्शेहचे हजारो वंशज असे आहेत.”

  6. जबुलूनाविषयी तो म्हणाला: “जबुलूना, तुझा प्रवास तुझ्यासाठी आनंदाचा होवो आणि तू इस्साखारा, आपल्या डेऱ्यात उल्हास करो.

  7. ते लोकांना डोंगरावर बोलवतील व तिथे न्याययुक्त अशी यज्ञार्पणे वाहतील; समुद्रातून मिळविलेल्या उत्पन्नाचे ते स्वामी होतील, वाळूतून आपले गुप्तधन काढतील.”

  8. गादाविषयी तो म्हणाला: “धन्य आहे गादाचा विस्तार! गाद सिंहासारखा जीवन जगतो, झडप घालून तो भुजा आणि डोके फोडतो.

  9. त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्‍यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.”

  10. दानाविषयी तो म्हणाला: “दान हा सिंहाच्या छाव्यासारखा आहे, बाशानातून तो सिंहासारखी झेप घेतो.”

  11. नफताली विषयी तो म्हणाला: “नफताली याहवेहच्या सर्व आशीर्वादांनी तृप्त आहे आणि त्यांच्या कृपेत परिपूर्ण आहे; तो सागरापर्यंतचा दक्षिण भाग वतन करून घेईल.”

  12. आशेराविषयी तो म्हणाला: “आशेर हा पुत्रांपैकी सर्वात धन्य आहे; त्याला सर्व भावांची कृपादृष्टी प्राप्त होवो आणि त्याचे पाय तेलाने धुतले जावोत.

  13. लोखंड आणि काशांच्या अडसरांनी त्याच्या शहराचे रक्षण होवो, आणि तुझे सामर्थ्य तुझ्या जीवनमानाइतके असो.

  14. “यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात.

  15. सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात.

  16. म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील.

  17. इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”

  18. “सकाळी तुम्ही तुमच्या गोत्राप्रमाणे याहवेहसमोर उपस्थित व्हावे. जे गोत्र याहवेह निवडतील त्यांनी त्यांच्या कुळाप्रमाणे पुढे यावे; ज्या कुळाची याहवेह निवड करतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रमाणे पुढे यावे; आणि ज्या कुटुंबाची याहवेह निवड करतील त्यातील प्रत्येक पुरुषाने पुढे यावे.

  19. यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.

  20. मोशेने गाद गोत्रास त्यांच्या कुळानुसार हे वतन दिले:

  21. गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती.

  22. आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत;

  23. व खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती).

  24. ही नगरे व गावे गादच्या गोत्राला त्यांच्या कुळानुसार वतन म्हणून दिली होती.

  25. मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले: