मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने

241 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

  2. अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे).

  3. यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली.

  4. एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.

  5. याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते.

  6. अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते.

  7. योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.

  8. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली.

  9. राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “आम्हाला दावीदामध्ये, इशायच्या मुलाशी आमचा काय वाटा, इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे लोक परत घरी गेले.

  10. परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

  11. अदोनिराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु सर्व इस्राएलने त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

  12. याप्रकारे इस्राएली लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.

  13. यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले.

  14. नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला.

  15. “मी अशाच एका प्रवासात असताना दिमिष्कमधून महायाजकांचे अधिकारपत्र व नियुक्तपत्र बरोबर घेऊन जात होतो.

  16. परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,