मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने

241 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.

  2. (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)

  3. ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.

  4. एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.

  5. शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.

  6. हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली.

  7. बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: बेलापासून बेलाई कूळ; आशबेलपासून अशबेली कूळ; अहीरामपासून अहीरामी कूळ;

  8. शफूफामपासून शूफामी कूळ; हूफामपासून हूफामी कूळ.

  9. आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ.

  10. ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.

  11. दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ.

  12. ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.

  13. आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;

  14. आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.

  15. आशेरला सेराह नावाची कन्या होती.

  16. ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.

  17. नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;

  18. येसेरपासून येसेरी कूळ; शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ.

  19. ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.

  20. इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली.

  21. इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक हजार पुरुषांना युद्धासाठी पाठवा.”

  22. मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?

  23. याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता?

  24. मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते.

  25. अष्कोलच्या खोर्‍यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले.