- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Strife बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
द्वेष कलहास चेतावणी देतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.
जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.
विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.
कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.
भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.
जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.
मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात; आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते.
चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे.
मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्या गळक्या छप्परासारखी आहे.
कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.
“वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.
भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे!
टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील.
कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे? कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत? कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत?
जे मद्यपानासाठी घुटमळतात, जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात.
ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील?
भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्यात राहणे बरे.
आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्यासारखे असतात.
लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो.
भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.