Apollos
Apollos चा उल्लेख असलेली वचने
त्याचवेळी आलेक्सांद्रियाचा रहिवासी, अपुल्लोस नावाचा यहूदी इफिस येथे आला होता. तो एक विद्वान मनुष्य होता आणि त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
अपुल्लोस करिंथ येथे असताना, पौल अंतर्भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तिथे त्याला काही शिष्य आढळले.
माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे,” तर कोणी “मी अपुल्लोसाचा” आणखी कोणी “मी केफाचा अनुयायी आहे,” आणखी कोणी “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.”
तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभूने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती.
मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले.
मग तो पौल, अपुल्लोस किंवा केफा किंवा जग, जीवन आणि मरण किंवा सांप्रत काळ किंवा भविष्यकाळ हे सर्व तुमचे आहेत.
आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्याला कमी लेखू नये.
आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल.
जेनस जो विधि-विशेषज्ञ व अपुल्लोस यांच्या प्रवासासाठी तुमच्याकडून शक्य होईल ती सर्व मदत करा आणि त्यांना लागणार्या गरजेच्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत याची काळजी घ्या.