Skip to content

Strife बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यावरही ते तुझे ऐकण्यास तयार झाले नाही, तर तुझा दावा मंडळीकडे घेऊन जा आणि मंडळीचेही ऐकण्याचे त्यांनी नाकारले, तर तो एखादा गैरयहूदी किंवा जकातदार आहे असे समजून तू त्याच्याशी वाग.

  2. जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही.

  3. जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही.

  4. मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले.

  5. परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.

  6. जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”

  7. परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले.

  8. नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्‍या गावाकडे निघून गेले.

  9. त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते.

  10. मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे, असे तुम्हाला वाटते का? नाही, मी तर फूट पाडण्यासाठी आलो आहे.

  11. येथून पुढे एका कुटुंबात असलेल्या पाचजणांत एकमेकांविरुद्ध फूट पडेल, तिघांविरूद्ध दोघे आणि दोघांविरुद्ध तिघे असे होतील.

  12. ते विभागले जातील त्यांच्यामध्ये फूट पडेल, बापाविरुद्ध पुत्र आणि पुत्राविरुद्ध पिता, मुलगी आईविरुद्ध आणि आई मुलीविरुद्ध, सासू सुनेविरुद्ध आणि सून सासूविरुद्ध.”

  13. ज्यावेळी तुम्ही शत्रूबरोबर न्यायालयात जाण्यापूर्वी वाटेत एकत्रित असतानाच संबंध नीट करा, नाहीतर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश अधिकार्‍याच्या हाती सोपवून देईल आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकेल.

  14. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही.”

  15. नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला.

  16. पौल आणि बर्णबाचा त्यांच्याबरोबर प्रखर मतभेद व वादविवाद झाला. शेवटी पौल आणि बर्णबाबरोबर इतर काही विश्वासणार्‍यांची नेमणूक करण्यात आली व या प्रश्नांसंबंधी यरुशलेम येथे प्रेषित व वडीलजनांना भेटावे म्हणून त्यांना पाठविण्यात आले.

  17. याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले,

  18. तो हे बोलला तेव्हा परूशी व सदूकी यांच्यात कलह होऊन सभेत फूट पडली.

  19. पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील.

  20. साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा.

  21. दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.

  22. विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका.

  23. तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.

  24. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.

  25. आता बंधूंनो व भगिनींनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की, जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फूटी व अडथळे आणणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा; आणि त्यांच्यापासून दूर राहा.