- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Strife बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.
माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे.
कारण बंधूंनो व भगिनींनो, तुम्हामध्ये भांडणे आहेत, असे मला ख्लोवेच्या घरातील काही लोकांनी सांगितले आहे.
माझ्या म्हणण्याचा अर्थ हा: तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे,” तर कोणी “मी अपुल्लोसाचा” आणखी कोणी “मी केफाचा अनुयायी आहे,” आणखी कोणी “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे.”
ख्रिस्त विभागले गेले आहेत का? तुमच्यासाठी पौलाला क्रूसावर दिले होते का? तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला होता का?
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आत्म्याद्वारे जीवन जगत असलेल्या लोकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्याबरोबर बोलू शकलो नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लहान बालक असून अजूनही दैहिक आहात.
तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?
तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्याला कमी लेखू नये.
तुम्हाला इतरांपासून वेगळे कोणी केले? तुमच्याजवळ असे काय आहे की जे तुम्हाला मिळालेले नाही? ज्याअर्थी तुम्हाला सर्व मिळाले आहे, तर तुम्हाला मिळाले नाही अशी बढाई का मारता?
जर तुमचा कोणाविरुद्ध वाद असल्यास, तो प्रभूच्या लोकांकडे न नेता, एखाद्या अनीतिमान न्यायाधीशाकडे नेण्याचे धैर्य कसे करता?
आपण प्रभूचे लोक जगाचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहीत नाही काय? असे असताना, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींचा आपसात न्याय करण्यास समर्थ नाही का?
आपण स्वतः देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच्या तुलनेत या जगाच्या गोष्टी काहीच नाहीत.
जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता?
तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का?
उलट एक विश्वासणारा मनुष्य त्याच्या बंधुवर फिर्याद करतो आणि ती ही विश्वास न ठेवणार्यांपुढे!
तुम्हामध्ये खटले आहेत याचा अर्थ हाच की तुमचा पूर्णपणे पराजय झालेला आहे. त्याऐवजी तुम्ही अन्याय का सहन करत नाही? स्वतःची फसवणूक का करून घेत नाही?
याबाबतीत कोणी वाद घालत असेल, तर आम्हामध्ये आणि परमेश्वराच्या सर्व मंडळ्यांमध्ये इतर रीत प्रचलित नाही.
आता खालील गोष्टीबद्दल मला तुमची प्रशंसा करता येत नाही, कारण तुमचे सभेमध्ये एकत्र येणे तुमचे हित करण्यापेक्षा अधिक नुकसानच करते.
पहिली गोष्ट अशी की मंडळी म्हणून तुम्ही एकत्र येत असला तरी, तुमच्यात फूट आहे, असे मी ऐकतो आणि त्यावर काही अंशी माझा विश्वास आहे.
तुम्हामध्ये मतभेद असणे गरजेचे आहे, म्हणजे परमेश्वराने मान्यता दिलेले कोण आहेत, हे आपोआप उघड होईल.
कारण मला अशी भीती वाटते की जेव्हा मी येईन, तेव्हा तुम्ही मला जसे पाहिजे तसे आढळणार नाही, आणि जसा तुम्हाला पाहिजे तसा मी तुम्हाला आढळणार नाही. मला भीती वाटते की तुम्हामध्ये भांडणे, द्वेष, राग, स्वार्थी आकांक्षा, निंदा, चहाड्या, आढ्यता आणि अव्यवस्था यांनी भरलेले असे आढळाल.
मला प्रभूमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल.
तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.
देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा,