मुख्य मजकुरावर जा

Strife बद्दल बायबलमधील वचने: Christ, an example of avoiding

12 वचने · 57 पैलू

"Strife" साठी शोधा

Christ, an example of avoiding बद्दल वचने

  1. तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही.

  2. परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्‍यांना बरे केले.

  3. त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका, अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली.

  4. या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी:

  5. “पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो मला प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय जाहीर करेल.

  6. तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.

  7. मग एका शोमरोनी गावात त्यांच्यासाठी तयारी करण्याकरिता त्यांनी आपले संदेशवाहक पुढे पाठविले.

  8. परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.

  9. जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”

  10. परंतु येशूंनी वळून त्यांना धमकाविले.

  11. नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्‍या गावाकडे निघून गेले.

  12. जेव्हा त्यांनी त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी कधी उलट उत्तर दिले नाही, जेव्हा दुःख भोगले त्यांनी धमकाविले नाही. त्यापेक्षा त्यांनी जो न्यायीपणाने न्याय करतो त्यांच्याकडे स्वतःला सोपवून दिले.