Skip to content

Strife बद्दल बायबलमधील वचने: General references

124 वचने · 57 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत.

  2. अशा रीतीने त्याने त्याच्या भावांची रवानगी केली. त्यांना प्रत्यक्ष निरोप देताना तो त्यांना म्हणाला, “रस्त्याने जाताना भांडू नका!”

  3. तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?

  4. आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी तुम्ही मनुष्यांच्या युक्तीपासून त्यांचे रक्षण करता; आपल्या मंडपात तुम्ही त्यांना शत्रूंच्या आरोप करणार्‍या जिभेपासून बचाव करता.

  5. प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका, कारण शहरात मला हिंसा आणि कलह दिसतात.

  6. तुम्ही आम्हाला शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केले आहे; ते आपसात आमचा उपहास करतात.

  7. जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस.

  8. त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो,

  9. तो आपले डोळे मिचकावितो, आपल्या पायांनी इशारे करतो, आणि आपल्या हाताच्या बोटांनी खुणावतो.

  10. जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो— तो नेहमीच भांडणाला चेतावणी देतो.

  11. याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:

  12. गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,

  13. हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.

  14. खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.

  15. द्वेष कलहास चेतावणी देतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर आच्छादन टाकते.

  16. जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.

  17. तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.

  18. विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.

  19. कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.

  20. भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.

  21. जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.

  22. मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात; आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते.

  23. चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे.

  24. मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्‍या गळक्या छप्परासारखी आहे.

  25. कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.