Skip to content

Strife बद्दल बायबलमधील वचने

158 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट,

  2. हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

  3. शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे.

  4. हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात.

  5. दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे.

  6. स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे.

  7. जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा,

  8. म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्‍यांप्रमाणे चमकाल.

  9. आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी.

  10. या गोष्टी सोडून अनेकजण निरर्थक बोलण्याकडे वळले आहेत.

  11. ते नियमशास्त्राचे शिक्षक होण्यास अभिलाषी आहेत, परंतु ज्या गोष्टींबद्दल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात आणि सांगतात त्या गोष्टी त्यांनाच समजत नाहीत.

  12. म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे.

  13. तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.

  14. तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.

  15. जर कोणी, इतर कोणतेही मत शिकवितो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य बोध आणि सुभक्तीचे शिक्षण मान्य करीत नाही,

  16. तर तो अहंकारी आहे व त्याला काहीच समजत नाही. त्याला शब्दयुद्ध व वादविवाद यांची विकृत आवड आहे. यांच्यापासूनच हेवा, कलह, कोणाची बदनामी होईल असे बोलणे, दुष्ट संशय,

  17. आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात.

  18. हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.

  19. कित्येक ती स्वीकारून विश्वासापासून ढळले आहेत. परमेश्वराची कृपा तुझ्याबरोबर असो.

  20. परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्‍यांचा नाश होतो.

  21. परंतु मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वादात गुंतला जाऊ नकोस, कारण त्याद्वारे भांडणे होतात हे तुला ठाऊक आहे.

  22. प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत.

  23. विरोध करणार्‍यांना नम्रतेने शिकविण्याचा प्रयत्न कर, कदाचित परमेश्वर त्यांना सत्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पश्चात्ताप देईल.

  24. आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे,

  25. त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे.