मुख्य मजकुरावर जा

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही; आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.

  2. तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला

  3. मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले. तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”

  4. एक गीत. आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, तुम्ही मौन धरू नका; आमच्यासाठी कान बहिरे करू नका, असे अलिप्त राहू नका.

  5. पाहा तुमचे शत्रू कसे गुरगुरतात, तुमच्या विरोधकांनी आपले डोके वर काढले आहे.

  6. हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्‍याने उडणार्‍या भुशागत त्यांना करा.

  7. अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते,

  8. आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग करा, व आपल्या तुफानाने त्यांना घाबरवून सोडा.

  9. हे याहवेह, तुम्ही त्यांना पूर्णपणे लज्जित करा, जेणेकरून त्यांनी तुमच्या नावाचा शोध करावा.

  10. ते कायमचे फजीत होवोत आणि गोंधळून जावोत; त्यांचा लज्जास्पद नाश होऊ द्या.

  11. त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.

  12. दावीदाची एक प्रार्थना हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या, कारण मी दीन व दरिद्री आहे.

  13. माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे; तुमच्यावर भरवसा ठेवणार्‍या सेवकाला वाचवा, तुम्ही माझे परमेश्वर आहात;

  14. हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, कारण मी दिवसभर तुमचा धावा करतो.

  15. हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या, कारण मी केवळ तुमच्यावरच श्रद्धा ठेवली आहे.

  16. हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात, तुमच्याकडे धाव घेणार्‍या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.

  17. याहवेह, माझी प्रार्थना ऐका; तुमच्या कृपेसाठी केलेला माझा धावा ऐका.

  18. मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन, कारण तुम्ही मला उत्तर देता.

  19. तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या, म्हणजे माझे शत्रू ते पाहतील व लज्जित होतील, कारण हे याहवेह, तुम्ही मला साहाय्य केले आणि माझे समाधान केले.

  20. एक गीत. कोरहाच्या पुत्रांची स्तोत्र रचना. संगीत निर्देशकाकरिता. माहालाथ लान्‍नोथ चालीवर आधारित. एज्रावंशी हेमानचा मासकील हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे;

  21. माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो; माझ्या आरोळीकडे कान द्या.

  22. वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत. याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो; हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.

  23. परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो; माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.

  24. हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला, आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?

  25. हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली?