मुख्य मजकुरावर जा

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या; तुम्ही विपुल कृपेने आपले मुख माझ्याकडे करा.

  2. त्यांचे डोळे अंधकारमय होवोत म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.

  3. तुमचा सर्व क्रोध त्यांच्यावर ओता; तुमचा संतापाचा भयानक अग्नी त्यांच्यावर येऊ द्या.

  4. त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा आणि तुमच्या तारणाचा वाटा त्यांना देऊ नका.

  5. जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत; नीतिमानांच्या यादीत त्यांची नावे येऊ नयेत.

  6. याहवेह गरजूंचे ऐकतात आणि ते आपल्या बंदिवानांचा अव्हेर करीत नाही.

  7. माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.

  8. जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात, ते लज्जित होऊन माघारी फिरोत.

  9. परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका.

  10. जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत; जे माझे वाईट करू इच्छितात त्यांना अपयश आणि अप्रतिष्ठा यांनी आच्छादून टाका.

  11. आता माझे केस पांढरे झालेले असताना आणि मी वयस्कर झालो असताना, परमेश्वरा, माझा त्याग करू नका; तुमच्या सर्व सामर्थ्याचे वर्णन नवीन पिढीला आणि त्यांच्या मुलांना देखील सांगण्यासाठी तुम्ही मला अवधी द्या.

  12. परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.

  13. हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार? तुमच्या नावाची निंदा शत्रू सर्वकाळ करणार काय?

  14. तुम्ही आपला हात, आपला उजवा हात का आवरून धरला आहे? आपल्या वस्त्रांमध्ये लपलेला हात बाहेर काढा आणि तुमच्या शत्रूचा संहार करा!

  15. याहवेह, पाहा हे शत्रू तुमची कशी थट्टा करीत आहेत; उन्मत्त राष्ट्राने तुमच्या नावाची कशी निंदा केली आहे, याचे स्मरण करा.

  16. तुमच्या कराराचे स्मरण करा, कारण पृथ्वीवरील काळोखाचे प्रदेश हिंसेची स्थाने झाली आहेत.

  17. पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका; दरिद्री आणि दुःखी तुमच्या नावाची स्तुती करोत.

  18. परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा; मूर्ख तुमची दिवसभर अवहेलना करीत असतात, याची आठवण ठेवा.

  19. तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या शत्रूंचा कोलाहल क्षणोक्षणी वाढतच आहे.

  20. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत. मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला; परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.

  21. माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली; रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो, तरीही माझे सांत्वन झाले नाही.

  22. इतर राष्ट्रांनी का म्हणावे, “यांचा देव कुठे आहे?” आमच्या डोळ्यादेखत या राष्ट्रांना प्रगट करा, की तुमच्या लोकांच्या या भीषण कत्तलीचा तुम्ही सूड घेता.

  23. बंदिवानांचे उसासे तुम्ही ऐका; मरणदंड झालेल्याची सुटका करून तुम्ही आपल्या सामर्थ्याची थोरवी सिद्ध करा.

  24. हे प्रभू, तुमची निंदा करणार्‍या या शेजार्‍यांचा सातपट सूड त्यांच्या झोळीत घाला.

  25. हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध, कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार?