मुख्य मजकुरावर जा

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर. दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव.

  2. त्या सर्वांना मातीत एकत्रच गाडून टाक; कबरेमध्ये त्यांची तोंडे कफनवस्त्रांनी झाकून टाक.

  3. मग मी स्वतः हे मान्य करेन की तुझाच उजवा हात तुला वाचवू शकतो.

  4. “बेहेमोथ कडे पाहा, तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले. तो बैलाप्रमाणे गवत खातो.

  5. त्याच्या कमरेत किती शक्ती आहे, आणि त्याच्या पोटाचे स्नायू किती बळकट आहेत!

  6. गंधसरूप्रमाणे त्याचे शेपूट झोकांडत असते. त्याच्या मांड्यांच्या हाडांचे स्नायू एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.

  7. त्याची हाडे कास्याच्या नळ्यासमान आहेत; त्याचे अवयव पोलादी गजासारखे आहेत.

  8. परमेश्वराच्या कृत्यांमध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे, तरीही त्याचा उत्पन्नकर्ता त्याच्याजवळ तलवार घेऊनच जातो.

  9. डोंगर आपले उत्तम उत्पादन त्याला पुरवितात; आणि सर्व वनपशू त्याच्याभोवती खेळतात.

  10. कमलिनीखाली तो पडून राहतो, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत तो लपून असतो.

  11. कमलिनी आपल्या छायेत त्याला झाकतात; ओढ्याच्या सभोवतीची उंच वाळुंजे त्याला वेढून घेतात.

  12. उफळत्या नदीचे प्रवाह त्याला हानी करत नाही; यार्देनेचा ओघ त्याच्या तोंडावर वेगाने आला तरी तो सुरक्षित असतो.

  13. उघड्या डोळ्यांनी कोणी त्याला धरेल काय, किंवा त्याला जाळ्यात अडकवून त्याचे नाक टोचतील काय?

  14. “लिव्याथानाला माशाचा गळ घालून तू पकडू शकशील काय किंवा त्याच्या जिभेला दोर बांधू शकशील काय?

  15. त्याच्या नाकातून तू दोरखंड टाकू शकतो काय किंवा त्याच्या जाभाडामध्ये आकडा खुपसशील काय?

  16. दयेसाठी तो तुझ्याकडे विनवणी करीत राहील काय? तो तुझ्याशी सौम्य शब्दांनी बोलेल काय?

  17. जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे म्हणून तो तुझ्याशी करार करेल का?

  18. एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील?

  19. विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?

  20. त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय?

  21. जर तू आपला हात त्याच्यावर ठेवला, तर त्या संघर्षाचे तुला स्मरण होऊन तसे तू पुन्हा कधीही करणार नाही!

  22. त्याच्यावर वर्चस्व करण्याची कोणतीही आशा खोटी आहे; तो केवळ नजरेसमोर असणेच अत्यंत तीव्रतेचे आहे.

  23. त्याला भडकवू शकेल इतके उग्र कोणीही नाही. तर मग माझ्याविरुद्ध कोण उभा राहील?

  24. मला कोणाचे काही देणे लागते असा दावा कोणाकडे आहे? आकाशाखाली आहे ते सर्वकाही माझेच आहे.

  25. “लिव्याथानाचे अवयव, त्याची शक्ती आणि त्याच्या शरीराच्या आकर्षक आकाराविषयी बोलण्यास मी चुकणार नाही.