मुख्य मजकुरावर जा

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय?

  2. “ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय?

  3. आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय?

  4. पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला?

  5. मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील?

  6. When the dust groweth into hardness, and the clods cleave fast together?

  7. “सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का?

  8. ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात?

  9. कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?

  10. “रानशेळ्या कधी प्रसवितात हे तू जाणतो काय? हरिणी आपल्या पाडसाला जन्म देताना तू पाहतो का?

  11. प्रसवे पर्यंत त्यांचे महिने तू मोजतो काय? त्यांचा प्रसविण्याचा समय तुला कळतो काय?

  12. त्या ओणवतात आणि आपल्या पिलांना प्रसवितात; व त्यांच्या प्रसूती वेदना संपतात.

  13. त्यांच्या पिल्लांची भरभराट होते व मोकळ्या रानात ते जोमाने वाढतात; ते सोडून जातात व परत येत नाहीत.

  14. “रानगाढवांना कोणी मोकळे सोडून दिले? त्यांचे दोर कोणी सोडले?

  15. मीच त्यांना रान त्यांचे घर म्हणून दिले आहे, आणि क्षारभूमी त्यांचे वसतिस्थान म्हणून दिले आहे.

  16. नगरातील गोंधळाला ते हसतात; चालकाची ओरड त्याला ऐकू येत नाही.

  17. टेकड्यांवर कुरणासाठी ते रांगा धरतात आणि जे काही हिरवेगार ते शोधत असतात.

  18. “रानबैल तुझी सेवा करण्यासाठी संमती देईल काय? रात्रीच्या वेळी तो तुझ्या गोठ्यात राहील काय?

  19. त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय? तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय?

  20. त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय? तुझी जड कामे तू त्याच्यावर सोडशील काय?

  21. खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन ते तुझ्या मळणीपर्यंत तो ते आणेल असा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय?

  22. “जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.

  23. ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते,

  24. एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही.

  25. ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत; तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही,