Skip to content

God बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

354 वचने · 46 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती; त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.

  2. आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे, व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.

  3. ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात; आणि शेतांवर पाणी पाडतात.

  4. नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.

  5. धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये, म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात,

  6. ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात, आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात.

  7. दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो; आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात.

  8. परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून; व बलवानांच्या तावडीतून वाचवितात.

  9. म्हणून दीन लोकांस आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करेल.

  10. “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य; म्हणून सर्वसमर्थाचे शासन तू तुच्छ मानू नको.

  11. कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात; ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.

  12. सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.

  13. दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील; युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.

  14. “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?

  15. त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.

  16. त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?

  17. ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात.

  18. ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.

  19. ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्‍यांचा प्रकाश मुद्रित करतात.

  20. तेच एकटे आकाश ताणून पसरवितात आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात.

  21. सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत.

  22. आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये; आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात.

  23. ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही.

  24. जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?

  25. परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत; राहाबाच्‍या सैन्याची टोळी सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते.