मुख्य मजकुरावर जा

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही.

  2. परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते.

  3. “घोड्याला त्याचे बळ तू देतोस काय अथवा त्याच्या मानेवर आयाळ तू पांघरलेस काय?

  4. टोळाप्रमाणे त्याला तू उड्या मारण्यास लावतोस काय? जे त्यांच्या गर्विष्ठपणात आतंक व्यक्त करतात?

  5. ते यांच्या भयंकर पंजाने ओरखडत आपल्या बळात उल्हास करतो, आणि शत्रूशी सामना करण्यासाठी धावून येतो.

  6. तो भयास हसतो आणि कशालाही घाबरत नाही; तलवारीपासून तो मागे हटत नाही.

  7. त्याच्या पाठीवर असलेला भाता; व त्याच्याबरोबर ठेवलेला चमकणारा भाला व बरची खणखणत असते.

  8. तो बेभान आवेशात भूमी गिळंकृत करतो; रणशिंगाच्या गर्जनेने तो स्तब्ध उभा राहू शकत नाही.

  9. तुतारीच्या नादाला तो ‘वाह!’ असे ओरडतो, दुरूनच तो लढाईचा वास घेतो, मग ती सेनापतीची ओरड असो किंवा रणगर्जना.

  10. “बहिरी ससाणा उंच उडतो, आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय?

  11. तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्‍या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?

  12. तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे.

  13. तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो; त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते.

  14. तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात. आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.”

  15. याहवेहने इय्योबास पुढे म्हटले,

  16. “जो सर्वसमर्थाशी वाद घालतो, तो त्यांना सुधारणार का? जो परमेश्वरावर आरोप करतो, त्याने परमेश्वराला उत्तर द्यावे!”

  17. तेव्हा इय्योब याहवेहला म्हणाला:

  18. “मी अयोग्य आहे; मी तुम्हाला काय उत्तर देणार? मी माझा हात माझ्या मुखावर ठेवतो.

  19. मी एकदा बोललो, पण माझ्याकडे उत्तर नाही; दोनदा मी बोललो, पण मी पुन्हा बोलणार नाही.”

  20. मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले:

  21. “पुरुषासारखी आपली कंबर कस; मी तुला प्रश्न विचारतो, आणि तू मला त्याचे उत्तर देशील.

  22. “माझ्या न्याया विषयी तू संशय धरशील काय? स्वतःचे समर्थन करावे म्हणून तू मला दोष लावशील काय?

  23. तुझा बाहू परमेश्वरासारखा आहे काय, तुझा आवाज त्यांच्यासारखा गडगडाट करू शकतो काय?

  24. मग गौरव आणि वैभव यांनी स्वतःला सुशोभित कर, आणि सन्मान व ऐश्वर्य ही परिधान कर.

  25. तू आपल्या क्रोधाचा त्वेष मोकळा सोडून दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाकडे पाहा व त्यांना खाली वाकव,