मुख्य मजकुरावर जा

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; मी तुला प्रश्न करणार, आणि तू मला उत्तर देशील.’

  2. माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.

  3. म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”

  4. जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

  5. मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

  6. तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.

  7. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

  8. दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

  9. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.

  10. याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला; त्यांच्या मुख श्वासाने सर्व नक्षत्रे निर्माण झाली.

  11. बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत; त्यांच्या भांडारात सागरांचा साठा करीत आहेत.

  12. दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे; सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.

  13. पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.

  14. त्यांनी आपला कोश बंदिवासात जाऊ दिला, त्यांनी आपले वैभव शत्रूंच्या हाती पडू दिले.

  15. त्यांनी आपल्या लोकांना तलवारीच्या स्वाधीन केले, वतनावरचा त्यांचा क्रोध अनावर झाला होता.

  16. एज्रावंशातील एथानचा एक मासकील मी याहवेहच्या महान करुणामय प्रीतीचे सदासर्वदा गुणगान करेन; पिढ्यान् पिढ्या मी तुमच्या विश्वसनीयतेची माझ्या मुखाने साक्ष देईन.

  17. मी जाहीर करेन की, तुमची प्रीती आणि तुमची दया सर्वकाळ टिकणारी आहेत; तुमचे सत्य स्वर्गामध्ये तुम्ही स्थिर केले आहे.

  18. स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे; कारण तुम्हीच ते आणि त्यामधील सगळे काही प्रस्थापित केले आहे.

  19. उत्तर आणि दक्षिण दिशा तुम्हीच निर्माण केल्या; ताबोर व हर्मोन पर्वत तुमच्या नामाचा आनंदाने गजर करतात.

  20. पण मी माझी प्रेममयदया त्याच्यापासून कधीही काढून घेणार नाही व माझी सत्यता मी त्यागणार नाही.

  21. मी माझा करार मोडणार नाही; मी जे बोललो त्यातील एक शब्दही बदलणार नाही.

  22. एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

  23. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

  24. वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.

  25. ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”