मुख्य मजकुरावर जा

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.

  2. एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे; त्यात लहानमोठ्या अशा असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे.

  3. यात जहाजांचे दळणवळण होत असते, आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला.

  4. निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो.

  5. जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता, तेव्हा ते गोळा करतात; तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात.

  6. परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता, तेव्हा ते व्याकूळ होतात; जेव्हा तुम्ही त्यांचा श्वास काढून घेता, तेव्हा ते मरतात व पुन्हा मातीत जाऊन मिसळतात.

  7. मग तुम्ही आपला आत्मा पाठविता, तेव्हा ते अस्तित्वात येतात, आणि पृथ्वीला पुन्हा नवे स्वरूप आणता.

  8. याहवेहचे वैभव सर्वकाळ राहो; याहवेहला आपल्या कृतीपासून आनंद होवो—

  9. त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते; ते स्पर्श करताच पर्वतातून धुराचे लोट बाहेर पडतात.

  10. काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत; ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.

  11. त्यांनी याहवेहची कृत्ये, समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले.

  12. ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन, त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.

  13. त्या वर आकाशापर्यंत जातात, व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात; या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.

  14. त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.

  15. ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत, सत्य आणि सात्विकतेला अनुसरून तयार केलेले आहेत.

  16. त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे; त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे— त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे.

  17. हे याहवेह, तुमचे वचन अनंतकाळचे आहे; ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर राहते.

  18. तुमची विश्वसनीयता पिढ्यान् पिढ्या टिकून राहते; तुम्ही पृथ्वीची स्थापना केली आणि ती आजतागायत स्थिर आहे.

  19. तुमचे नियम आजवर अस्तित्वात आहेत, कारण सर्वकाही तुमची सेवा करतात.

  20. ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.

  21. खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.

  22. याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर, सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील, त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.

  23. पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात; पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात.

  24. ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  25. त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.