Skip to content

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे.

  2. दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य, त्यांची करुणा सनातन आहे.

  3. रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे.

  4. संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.

  5. माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.

  6. माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.

  7. हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.

  8. तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.

  9. हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे, की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे.

  10. तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,

  11. कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.

  12. ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो.

  13. शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात.

  14. ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल?

  15. परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात, तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो.

  16. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.

  17. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.

  18. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.

  19. आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.

  20. परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.

  21. कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,

  22. यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—

  23. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.

  24. त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी,

  25. त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते,