मुख्य मजकुरावर जा

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.

  2. समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले, आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.

  3. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.

  4. तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,

  5. आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्‍याच्या पंखावर आरूढ होऊन जातात.

  6. ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.

  7. तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही.

  8. तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले.

  9. परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले;

  10. ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्‍याखोर्‍यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.

  11. तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये.

  12. त्यांनी खोर्‍यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.

  13. ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात.

  14. आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात.

  15. ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते.

  16. ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात, आणि मानवाने मशागत करावी— जमिनीतून अन्न उत्पादन करावे म्हणून:

  17. मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस, त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात.

  18. याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.

  19. त्यावर पक्षी आपली घरटी करतात व करकोचा त्याचे घरटे देवदारू वृक्षावर बांधतो.

  20. उंच पर्वत रानबकर्‍यांचे निवासस्थान आहेत, खडकांमध्ये डोंगरी ससे सुरक्षित बिळे करतात.

  21. त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे.

  22. ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.

  23. सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.

  24. सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात.

  25. मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात, व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात.