Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने: Counsels of

49 वचने · 45 पैलू

Counsels of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.

  2. आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  3. तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.

  4. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  5. त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.

  6. जेव्हा ते गिलआद येथे रऊबेन, गाद, आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे गेले; आणि त्यांना म्हणाले:

  7. “याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता?

  8. पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही.

  9. आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.

  10. जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.

  11. जेरहाचा पुत्र आखान समर्पित वस्तूसंबंधी अविश्वासू राहिला, तेव्हा संपूर्ण इस्राएली लोकांवर क्रोध आला नाही काय? त्याच्या पातकामुळे मरण पावणारा तो केवळ एकटाच नव्हता.’ ”

  12. तेव्हा रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी इस्राएलच्या कुटुंबप्रमुखांना उत्तर दिले:

  13. “याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! याहवेह जे सामर्थ्यशाली परमेश्वर आहेत! त्यांना माहीत आहे! आणि हे सर्व इस्राएलच्या लोकांना माहीत व्हावे! जर हे, याहवेहविरुद्ध बंड करण्यासाठी किंवा आज्ञाभंग असे असेल तर आज आम्हाला जिवंत सोडू नका.

  14. जर याहवेहपासून दूर जाण्यासाठी, आणि होमार्पण आणि अन्नार्पण किंवा शांत्यर्पण त्यावर करावे म्हणून आम्ही आमची स्वतःची वेदी बांधली असेल तर याहवेह स्वतः त्याचा हिशोब आमच्याकडून घेवो.

  15. “नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे?

  16. आमच्या आणि तुमच्यामध्ये याहवेहने यार्देन नदीची सीमा ठेवली आहे. तुम्ही रऊबेनी आणि गाद लोकांनो! याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही.’ तेव्हा तुमचे वंशज आमच्या वंशजांना याहवेहचे भय बाळगण्यास थांबवतील.

  17. “म्हणूनच आम्ही म्हणालो, ‘चला आपण तयार होऊन वेदी बांधू या, परंतु होमार्पणासाठी किंवा यज्ञासाठी नाही.’

  18. तर ती आमच्या आणि तुमच्या आणि पुढच्या पिढ्यांमध्ये साक्ष असावी, यासाठी की आम्ही होमार्पण, यज्ञे व शांत्यर्पणे करून याहवेहच्या पवित्रस्थानी सेवा करावी, म्हणजे ‘याहवेहमध्ये तुम्हाला वाटा नाही’ असे भविष्यात तुमचे वंशज आमच्या वंशजांना म्हणू शकणार नाहीत.

  19. “आणि आम्ही म्हणालो, ‘जर ते आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तर आम्ही उत्तर देऊ: आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या याहवेहच्या वेदीचा हा नमुना पाहा, होमार्पणे किंवा यज्ञांसाठी नाही, परंतु आमच्या आणि तुमच्यामध्ये ही साक्ष म्हणून असावी.’

  20. “याहवेहच्या विरुद्ध बंड करणे आणि त्यांच्या निवासमंडपासमोर उभ्या असलेल्या याहवेह आपल्या परमेश्वराची होमवेदी सोडून धान्यार्पण आणि यज्ञांसाठी दुसरी वेदी बांधून त्यांच्यापासून दूर जाणे हे आमच्याकडून कधी ना होवो.”

  21. जेव्हा फिनहास याजक आणि समाजाचे पुढारी; इस्राएलच्या कुळांच्या कुटुंबप्रमुखांनी रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना जे म्हणायचे होते ते ऐकले, तेव्हा त्यांचे समाधान झाले.

  22. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासने रऊबेन, गाद आणि मनश्शेहला उत्तर दिले, “आज आमची खात्री झाली आहे की, याहवेह आमच्याबरोबर आहेत, कारण तुम्ही वेदी बांधण्याबाबतीत याहवेहशी अविश्वासू राहिला नाहीत. तुम्ही इस्राएली लोकांना याहवेहच्या हातातून वाचविले आहे.”

  23. मग एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहास आणि पुढार्‍यांचे रऊबेनी व गाद लोकांशी गिलआद येथे बोलणे झाल्यावर ते कनानाकडे परतले व इस्राएली लोकांना वृत्तांत सांगितला.

  24. तेव्हा वृत्तांत ऐकून इस्राएली लोक आनंदित झाले व परमेश्वराची स्तुती केली आणि रऊबेनी व गाद लोकांशी लढण्याची किंवा ते राहतात त्या देशाचा नाश करण्याविषयी ते पुन्हा बोलले नाही.

  25. रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले.