Skip to content

War बद्दल बायबलमधील वचने: Frequently ordered

8 वचने · 45 पैलू

Frequently ordered बद्दल वचने

  1. तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.”

  2. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  3. “इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”

  4. जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील—

  5. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका.

  6. शमुवेल शौलास म्हणाला, “इस्राएल लोकांवर राजा म्हणून तुझा अभिषेक करण्यास याहवेहने मलाच पाठवले होते; तर आता याहवेहचा संदेश ऐक.

  7. सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार.

  8. तर आता तू जा, अमालेक्यांवर हल्ला कर आणि त्यांचे जे काही आहे त्या सर्वांचा सर्वस्वी नाश कर. त्यांची गय करू नको; त्यांचे पुरुष व स्त्रिया, लेकरे व तान्ही बाळे, गुरे व मेंढरे, उंट व गाढवे हे सर्व मारून टाक.’ ”