- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
War बद्दल बायबलमधील वचने: Evils of
Evils of बद्दल वचने
अबनेरने योआबाला हाक मारत म्हटले, “तलवारीने सर्वकाळ नाश करावा काय? तुला समजत नाही काय की याचा शेवट कटुत्वात होणार? आपल्या सोबतीच्या इस्राएली लोकांचा पाठलाग करण्याचे थांबविण्यास तुझ्या लोकांस तू आज्ञा कधी देणार?”
या आणि आमचे याहवेह करीत असलेली अद्भुत कृत्ये पाहा; त्यांनी पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
आसाफाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, इतर राष्ट्रांनी तुमच्या वतनावर आक्रमण केले आहे; त्यांनी तुमचे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे, आणि यरुशलेम नगरी नासधुशीचा ढीग झाली आहे.
तुमच्या सेवकांचे मृतदेह उघड्यावर पडून आहेत, ते पक्ष्यांचे भक्ष्य झाले आहेत, तुमच्या भक्तांचे मास वन्यपशूंचा आहार झाला आहे.
त्यांनी लोकांचे रक्त यरुशलेमच्या सभोवती पाण्याप्रमाणे वाहविले आहे, मृतांना पुरण्यासाठी कोणीही जिवंत नाही.
जो तुझी तान्ही बालके घेऊन, त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!
लोक एकमेकांवर अत्याचार करतील— पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.
तुमचे पुरुष तलवारीने पडतील, तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,
सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.
त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.
त्या दिवशी ते त्याच्यावर समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.
नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.
याहवेह सर्व लोकांना दूर पाठवून देईपर्यंत आणि देशाचा पूर्णपणे त्याग केला जाईपर्यंत.
लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल.
सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने भूमी होरपळून जाईल आणि लोक त्या आगीचे इंधन होतील; ते एकमेकांना वाचविणार नाहीत.
उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील परंतु ते भुकेले राहतील; डाव्या बाजूला असलेलेही खातील परंतु समाधानी होणार नाहीत. प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस खातील:
मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
जो कोणी पकडला जाईल, त्याला आरपार खुपसले जाईल. जे सर्व पकडले गेले, ते तलवारीने मारले जातील.
त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील; त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांचा विनयभंग केला जाईल.
मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी: मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे! मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे, एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!
दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील, मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत; नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरील केस आणि दाढी काढलेली आहे.
रस्त्यांवर ते गोणपाट घालतात; छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये ते सर्व आक्रोश करतात, विलाप करीत पालथे पडतात.
हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.
माझे मन मोआबसाठी रडते; तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत, एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात. ते लुहिथकडे टेकडीवर जातात, जाताना ते विलाप करतात; होरोनाईमच्या वाटेवर ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.
निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे आणि गवत करपून गेले आहे; वनस्पती सुकून गेली आहे; आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही.