मुख्य मजकुरावर जा

War बद्दल बायबलमधील वचने: God threatens defeat in

22 वचने · 45 पैलू

God threatens defeat in बद्दल वचने

  1. घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल; आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील. तरुण पुरुष व तरुण स्त्रिया, वृद्ध आणि बालके नाश पावतील.

  2. जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”

  3. जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे, आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”

  4. पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”

  5. तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?” त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण त्यांना तुमच्या हाती दिले जाईल.”

  6. राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”

  7. तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”

  8. सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: “पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे, शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे, परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.

  9. तुम्ही असे म्हणाला की, ‘नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होऊन पळून जाऊ.’ म्हणून तुम्ही पळून जाल! तुम्ही असे म्हणाला, ‘आम्ही वेगवान घोड्यांवर स्वार होऊ.’ म्हणून तुमचे पाठलाग करणारे चपळ होतील!

  10. जोपर्यंत तुम्हाला डोंगराच्या शिखरावर असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे, टेकडीवर लावलेल्या पताक्याप्रमाणे सोडून दिले जात नाही तोपर्यंत एका व्यक्तीच्या धमकीने एक हजार लोक पळून जातील; पाच जणांच्या धमकीने तुम्ही सर्वजण पळून जाल.”

  11. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्‍या लोकांशी मी वागेन.

  12. मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  13. ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  14. “मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘प्रभू असे म्हणतात: “ ‘एक तलवार, एक तलवार, धार लावलेली आणि चमकविलेली;

  15. कत्तल करण्यास धार लावलेली, विजेप्रमाणे चमकणारी अशी केलेली! “ ‘माझ्या राजपुत्राच्या राजदंडामुळे आम्ही आनंद करावा काय? तलवार अशा प्रत्येक काठीला तुच्छ लेखते.

  16. “ ‘हातात धरता यावी म्हणून, तलवार चमकण्यास नेमली आहे; ती धारदार व चमकविली गेली आहे, आणि कत्तल करणार्‍याच्या हातासाठी ती तयार केली गेली आहे.

  17. हे मानवपुत्रा, मोठ्याने रड आणि विलाप कर, कारण हे माझ्या लोकांविरुद्ध आहे; ते इस्राएलच्या सर्व राजपुत्रांविरुद्ध आहे. माझ्या लोकांसहित त्यांनासुद्धा तलवारीस देण्यात आले आहे. म्हणून तू आपले ऊर बडव.

  18. “ ‘कसोटी खचितच होणार आणि तलवारीने तुच्छ लेखलेला राजदंड पुढे चालला नाही तर काय होईल? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’

  19. “तर हे मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि तुझ्या हातावर हात मार. तलवार दोन वेळा वार करो, किंवा तीन वेळाही चालेल. ही तलवार कत्तल करण्यासाठी; तलवार जी मोठ्या वधासाठी आहे, जिने त्यांना चहूकडून घेरले आहे.

  20. म्हणजे त्यांची हृदये भीतीने पाणी पाणी होतील आणि पुष्कळ पडतील, कत्तल करण्यासाठीच ही तलवार त्यांच्या सर्व फाटकांवर मी नेमली आहे. पाहा! विजेसारखा वार करण्यास ती बनविली गेली आहे, हत्येसाठी ती उपसली गेली आहे.

  21. अगे तलवारी, उजवीकडे वार कर, मग डावीकडे वार कर, जिथे तुझे पाते फिरेल तिथे वार कर.

  22. मी सुद्धा माझा हात हातावर मारीन, आणि माझा क्रोध शांत होईल. मी याहवेह हे बोललो आहे.”