मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना १३:५सुमारे इ.स.पू. १४९०

    शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट;

  2. गणना १३:६सुमारे इ.स.पू. १४९०

    यहूदाह गोत्रातील यफुन्नेहचा पुत्र कालेब;

  3. गणना १३:७सुमारे इ.स.पू. १४९०

    इस्साखार गोत्रातील योसेफाचा पुत्र इगाल;

  4. गणना १३:८सुमारे इ.स.पू. १४९०

    एफ्राईमच्या गोत्रातील नूनाचा पुत्र होशा;

  5. गणना १३:९सुमारे इ.स.पू. १४९०

    बिन्यामीन गोत्रातील राफूचा पुत्र पालती;

  6. गणना १३:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    जबुलून गोत्रातील सोदीचा पुत्र गाद्दीयेल;

  7. गणना १३:११सुमारे इ.स.पू. १४९०

    मनश्शेहच्या गोत्रातील (योसेफाचे गोत्र) सुसीचा पुत्र गाद्दी;

  8. गणना १३:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    दान गोत्रातील गमल्लीचा पुत्र अम्मीएल;

  9. गणना १३:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    आशेर गोत्रातील मिखाएलचा पुत्र सेथूर;

  10. गणना १३:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    नफताली गोत्रातील वोफसीचा पुत्र नाहबी;

  11. गणना १३:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    गाद गोत्रातील माकीचा पुत्र गऊवेल.

  12. गणना १३:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.)

  13. गणना १३:१७सुमारे इ.स.पू. १४९०

    जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा.

  14. गणना १३:१८सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा.

  15. गणना १३:१९सुमारे इ.स.पू. १४९०

    ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे की वाईट आहे? कोणत्या प्रकारच्या नगरांमध्ये त्यांची वस्ती आहे? ते उजाड आहेत की तटबंदीची आहेत?

  16. गणना १३:२०सुमारे इ.स.पू. १४९०

    तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.)

  17. गणना १३:२१सुमारे इ.स.पू. १४९०

    मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला.

  18. गणना १३:२२सुमारे इ.स.पू. १४९०

    ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.)

  19. गणना १३:२३सुमारे इ.स.पू. १४९०

    ते जेव्हा अष्कोल खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली.

  20. गणना १३:२४सुमारे इ.स.पू. १४९०

    त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता.

  21. गणना १३:२५सुमारे इ.स.पू. १४९०

    देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले.

  22. गणना १३:२६सुमारे इ.स.पू. १४९०

    पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली.

  23. गणना १३:२७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे.

  24. गणना १३:२८सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले.

  25. गणना १३:२९सुमारे इ.स.पू. १४९०

    नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.”