- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १३:३०सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.”
- गणना १३:३१सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.”
- गणना १३:३२सुमारे इ.स.पू. १४९०
आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत.
- गणना १३:३३सुमारे इ.स.पू. १४९०
तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”
- गणना १४:१सुमारे इ.स.पू. १४९०
रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले.
- गणना १४:२सुमारे इ.स.पू. १४९०
सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!
- गणना १४:३सुमारे इ.स.पू. १४९०
आम्ही तलवारीने पडावे म्हणूनच या देशात याहवेह आम्हाला आणत आहेत काय? आमच्या स्त्रिया आणि लेकरांना गुलाम म्हणून नेण्यात येईल. आम्ही इजिप्तकडे परत जावे हे आमच्यासाठी बरे नाही काय?”
- गणना १४:४सुमारे इ.स.पू. १४९०
आणि ते एकमेकांना म्हणाले, “आपण एखाद्या पुढार्याची निवड करू आणि इजिप्त देशास परत जाऊ.”
- गणना १४:५सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा सर्व इस्राएली समुदाय जो तिथे एकत्र जमला होता, त्यांच्यासमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
- गणना १४:६सुमारे इ.स.पू. १४९०
नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब, जे त्यापैकीच देश हेरून आले होते तेही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली
- गणना १४:७सुमारे इ.स.पू. १४९०
आणि सर्व इस्राएली समुदायाला म्हणाले, “आम्ही ज्या देशातून फिरून आलो तो देश अतिशय चांगला आहे.
- गणना १४:८सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह जर आमच्याविषयी संतुष्ट असले तर त्या दूध व मध वाहत्या देशात ते आपल्याला घेऊन जातील आणि तो देश आम्हाला देतील.
- गणना १४:९सुमारे इ.स.पू. १४९०
मात्र याहवेहविरुद्ध बंड करू नका. आणि तेथील लोकांचे भय बाळगू नका, कारण आम्ही त्यांना नष्ट करणार. त्यांचे संरक्षण नाहीसे झाले आहे, परंतु याहवेह आमच्याबरोबर आहेत. त्यांचे भय बाळगू नका.”
- गणना १४:१०सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु सर्व समुदाय त्यांना धोंडमार करण्याविषयी बोलू लागले. तेव्हा सभामंडपावर सर्व इस्राएली लोकांना याहवेहचे तेज प्रकट झाले,
- गणना १४:११सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले, “हे लोक कुठवर माझा तिरस्कार करणार? त्यांच्यामध्ये मी केलेले सर्व चमत्कार पाहूनही कुठवर माझ्यावर विश्वास ठेवण्यास ते नकार देतील?
- गणना १४:१२सुमारे इ.स.पू. १४९०
मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.”
- गणना १४:१३सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे.
- गणना १४:१४सुमारे इ.स.पू. १४९०
आणि ते त्या देशात राहणार्यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता.
- गणना १४:१५सुमारे इ.स.पू. १४९०
जर तुम्ही या लोकांपैकी कोणालाही जिवंत न ठेवता मारून टाकले, तर ज्या राष्ट्रांनी तुमच्याविषयी ऐकले आहे ते म्हणतील,
- गणना १४:१६सुमारे इ.स.पू. १४९०
‘याहवेहने या लोकांना शपथ देऊन जो देश देऊ केला होता, त्यात त्यांना नेण्यास याहवेह असमर्थ होते म्हणून त्यांनी लोकांना रानातच मारून टाकले.’
- गणना १४:१७सुमारे इ.स.पू. १४९०
“आता प्रभूचे सामर्थ्य तुम्ही घोषित केल्याप्रमाणेच प्रकट होवो:
- गणना १४:१८सुमारे इ.स.पू. १४९०
‘याहवेह मंदक्रोध, अत्यंत प्रीती करणारे, अन्याय व पापाची क्षमा करणारे आहेत. तरीही ते दोषीला निर्दोष सोडत नाहीत; तर तिसर्या व चौथ्या पिढीपर्यंत आईवडिलांच्या पापाचे शासन त्यांच्या संततींना देतात.’
- गणना १४:१९सुमारे इ.स.पू. १४९०
आपल्या महान प्रीतीनुसार, जसे इजिप्त सोडले तेव्हापासून आतापर्यंत क्षमा केली, तसेच आताही त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करावी.”
- गणना १४:२०सुमारे इ.स.पू. १४९०
मग याहवेहने उत्तर दिले, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.
- गणना १४:२१सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे.