मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ११:३१सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात उंचीचा थर पसरला.

  2. गणना ११:३२सुमारे इ.स.पू. १४९०

    त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले.

  3. गणना ११:३३सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले.

  4. गणना ११:३४सुमारे इ.स.पू. १४९०

    म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले.

  5. गणना ११:३५सुमारे इ.स.पू. १४९०

    किब्रोथ-हत्ताव्वा येथून लोकांनी हसेरोथकडे प्रवास केला आणि तिथे राहिले.

  6. गणना १२:१सुमारे इ.स.पू. १४९०

    मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता.

  7. गणना १२:२सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले.

  8. गणना १२:३सुमारे इ.स.पू. १४९०

    (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.)

  9. गणना १२:४सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह लगेचच मोशे, अहरोन आणि मिर्यामला म्हणाले, “तुम्ही तिघेही सभामंडपाकडे बाहेर या.” तेव्हा ते तिघे बाहेर गेले.

  10. गणना १२:५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले,

  11. गणना १२:६सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो.

  12. गणना १२:७सुमारे इ.स.पू. १४९०

    परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

  13. गणना १२:८सुमारे इ.स.पू. १४९०

    मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”

  14. गणना १२:९सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याहवेहचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला आणि याहवेह त्यांना सोडून निघून गेले.

  15. गणना १२:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते,

  16. गणना १२:११सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा तो मोशेला म्हणाला, “माझे स्वामी, मी तुला विनंती करतो, कृपया, आम्ही मूर्खपणाने केलेले पाप आमच्याविरुद्ध मोजू नको.

  17. गणना १२:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    जसे एक तान्हे मृत बाळ आपल्या आईच्या उदरातून जन्माला येताच त्याचे अर्धे शरीर नष्ट झालेले असते, असे तिला राहू देऊ नको.”

  18. गणना १२:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!”

  19. गणना १२:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा पिता तिच्या तोंडावर थुंकला असता, तर तिला सात दिवस लाजेने घालवावे लागले असते की नाही? तिला सात दिवस छावणीच्या बाहेर वेगळे राहू दे, त्यानंतर तिला परत आणावे.”

  20. गणना १२:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही.

  21. गणना १२:१६सुमारे इ.स.पू. १४९०

    यानंतर त्यांनी हसेरोथ सोडले आणि पारान नावाच्या रानात तळ दिला.

  22. गणना १३:१सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  23. गणना १३:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.”

  24. गणना १३:३सुमारे इ.स.पू. १४९०

    म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते.

  25. गणना १३:४सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांची नावे ही आहेत: रऊबेन गोत्रातील जक्कूरचा पुत्र शम्मुवा;