- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १०:१७सुमारे इ.स.पू. १४९०
मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले.
- गणना १०:१८सुमारे इ.स.पू. १४९०
त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता.
- गणना १०:१९सुमारे इ.स.पू. १४९०
सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता.
- गणना १०:२०सुमारे इ.स.पू. १४९०
आणि देउएलाचा पुत्र एलीआसाफ हा गाद वंशाच्या दलावर होता.
- गणना १०:२१सुमारे इ.स.पू. १४९०
मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा.
- गणना १०:२२सुमारे इ.स.पू. १४९०
एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता.
- गणना १०:२३सुमारे इ.स.पू. १४९०
पदहसूरचा पुत्र गमलीएल हा मनश्शेह वंशाच्या दलावर होता,
- गणना १०:२४सुमारे इ.स.पू. १४९०
आणि गिदोनाचा पुत्र अबीदान हा बिन्यामीन वंशाच्या दलावर होता.
- गणना १०:२५सुमारे इ.स.पू. १४९०
शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता.
- गणना १०:२६सुमारे इ.स.पू. १४९०
ओक्रानाचा पुत्र पगीयेल हा आशेर वंशाच्या दलावर होता,
- गणना १०:२७सुमारे इ.स.पू. १४९०
आणि एनानाचा पुत्र अहीरा हा नफताली वंशाच्या दलावर होता.
- गणना १०:२८सुमारे इ.स.पू. १४९०
पुढे निघताना इस्राएली दलांच्या प्रवासाचा हा क्रम होता.
- गणना १०:२९सुमारे इ.स.पू. १४९०
आणि मोशेचा सासरा मिद्यानी रऊएलचा पुत्र होबाबला मोशे म्हणाला, “आम्ही त्या ठिकाणाकडे जात आहोत, ज्याविषयी याहवेहने सांगितले की, ‘मी ते तुम्हाला देईन.’ तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, कारण याहवेहने इस्राएली लोकांना उत्तम गोष्टींविषयी अभिवचन दिले आहे.”
- गणना १०:३०सुमारे इ.स.पू. १४९०
तो त्याला म्हणाला, “नाही, मी येणार नाही; मी माझा देश आणि माझ्या लोकांकडे जात आहे.”
- गणना १०:३१सुमारे इ.स.पू. १४९०
पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू.
- गणना १०:३२सुमारे इ.स.पू. १४९०
तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”
- गणना १०:३३सुमारे इ.स.पू. १४९०
मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला.
- गणना १०:३४सुमारे इ.स.पू. १४९०
ते छावणीतून निघाले तेव्हा दिवसा याहवेहचा मेघ त्यांच्यावर होता.
- गणना १०:३५सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा कोश पुढे जात असे तेव्हा मोशे म्हणे, “हे याहवेह, सक्रिय व्हा! तुमच्या शत्रूंची पांगापांग होवो; तुमचे वैरी तुमच्यापुढून पळून जावोत.”
- गणना १०:३६सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, “हे याहवेह, परत या, इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.”
- गणना ११:१सुमारे इ.स.पू. १४९०
मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला.
- गणना ११:२सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला.
- गणना ११:३सुमारे इ.स.पू. १४९०
म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता.
- गणना ११:४सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे!
- गणना ११:५सुमारे इ.स.पू. १४९०
इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते.