- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ९:१५सुमारे इ.स.पू. १४९०
ज्या दिवशी निवासमंडप, कराराच्या नियमाचा मंडप उभारण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याला झाकून टाकले. संध्याकाळपासून सकाळपर्यंत निवासमंडपावरील मेघ अग्नीसारखे दिसू लागले.
- गणना ९:१६सुमारे इ.स.पू. १४९०
आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले.
- गणना ९:१७सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत.
- गणना ९:१८सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या आज्ञेनुसार इस्राएली लोक प्रवासास निघत असत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत. जोपर्यंत निवासमंडपावर मेघ थांबत असे तोपर्यंत ते तळ देऊन राहत असत.
- गणना ९:१९सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत.
- गणना ९:२०सुमारे इ.स.पू. १४९०
कधीकधी मेघ काहीच दिवस निवासमंडपावर थांबत असे, तेव्हा याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देऊन राहत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात.
- गणना ९:२१सुमारे इ.स.पू. १४९०
कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी जेव्हा तो वरती घेतला जाई, लोक पुढे जात. तो दिवस असो किंवा रात्र, जेव्हा मेघ वरती घेतला जात असे, ते पुढे निघत असत.
- गणना ९:२२सुमारे इ.स.पू. १४९०
निवासमंडपावर मेघ दोन दिवस थांबून राहो किंवा एक महिना किंवा एक वर्ष राहो, इस्राएली लोक आपल्या छावणीत राहत आणि पुढे जात नसत; परंतु जेव्हा मेघ वर घेतला जाई, ते पुढे जात.
- गणना ९:२३सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले.
- गणना १०:१सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले:
- गणना १०:२सुमारे इ.स.पू. १४९०
“तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर.
- गणना १०:३सुमारे इ.स.पू. १४९०
दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे.
- गणना १०:४सुमारे इ.स.पू. १४९०
जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे.
- गणना १०:५सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे.
- गणना १०:६सुमारे इ.स.पू. १४९०
दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील
- गणना १०:७सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे.
- गणना १०:८सुमारे इ.स.पू. १४९०
“अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनीच कर्णे वाजवावे. हा तुम्हाला व येणार्या तुमच्या पिढ्यांसाठी सर्वकाळचा नियम असावा.
- गणना १०:९सुमारे इ.स.पू. १४९०
जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल.
- गणना १०:१०सुमारे इ.स.पू. १४९०
तुमच्या आनंदाच्या प्रसंगी; तुमचे नेमलेले सण व महिन्याच्या आरंभीची मेजवानी, जेव्हा तुम्ही आपली होमार्पणे व शांत्यर्पणे आणता, त्यावेळी सुद्धा तुम्ही कर्णे वाजवा आणि ते याहवेहसमोर तुमच्यासाठी स्मरणार्थ असेल. मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे.”
- गणना १०:११सुमारे इ.स.पू. १४९०
दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला.
- गणना १०:१२सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा इस्राएली लोक सीनायच्या रानातून निघाले आणि पारानाच्या रानात मेघ स्थिर होईपर्यंत एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी प्रवास करीत राहिले.
- गणना १०:१३सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार ते पहिल्या प्रवासास निघाले.
- गणना १०:१४सुमारे इ.स.पू. १४९०
यहूदाह वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली प्रथम निघाला. अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन त्यांचा सेनापती होता.
- गणना १०:१५सुमारे इ.स.पू. १४९०
सूवाराचा पुत्र नथानेल हा इस्साखार वंशाच्या दलावर होता,
- गणना १०:१६सुमारे इ.स.पू. १४९०
आणि हेलोनाचा पुत्र एलियाब जबुलून वंशाच्या दलावर होता.