मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गणना ७:८०सुमारे इ.स.पू. १४९०

    दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  2. गणना ७:८१सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  3. गणना ७:८२सुमारे इ.स.पू. १४९०

    पापार्पणासाठी एक बोकड;

  4. गणना ७:८३सुमारे इ.स.पू. १४९०

    आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  5. गणना ७:८४सुमारे इ.स.पू. १४९०

    जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्‍यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.

  6. गणना ७:८५सुमारे इ.स.पू. १४९०

    चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.

  7. गणना ७:८६सुमारे इ.स.पू. १४९०

    धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.

  8. गणना ७:८७सुमारे इ.स.पू. १४९०

    होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्‍हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.

  9. गणना ७:८८सुमारे इ.स.पू. १४९०

    शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्‍हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती.

  10. गणना ७:८९सुमारे इ.स.पू. १४९०

    जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.

  11. गणना ८:१सुमारे इ.स.पू. १४९०

    मग याहवेह मोशेला म्हणाले,

  12. गणना ८:२सुमारे इ.स.पू. १४९०

    “अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.”

  13. गणना ८:३सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले.

  14. गणना ८:४सुमारे इ.स.पू. १४९०

    दीपस्तंभ अशाप्रकारे घडविला गेला होता: जसे याहवेहने मोशेला दाखविले होते त्या नमुन्याप्रमाणेच तो त्याच्या बैठकीपासून त्याच्या फुलांपर्यंत सोन्याने घडविला होता.

  15. गणना ८:५सुमारे इ.स.पू. १४९०

    याहवेह मोशेला म्हणाले,

  16. गणना ८:६सुमारे इ.स.पू. १४९०

    “लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर.

  17. गणना ८:७सुमारे इ.स.पू. १४९०

    त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील.

  18. गणना ८:८सुमारे इ.स.पू. १४९०

    मग त्यांनी एक गोर्‍हा घ्यावा व त्याबरोबरचे अन्नार्पण जे जैतुनाच्या तेलात मळलेले सपीठ आणावे; आणि पापार्पणासाठी आणखी एक गोर्‍हा आणावा.

  19. गणना ८:९सुमारे इ.स.पू. १४९०

    लेव्यांना सभामंडपाच्या समोर घेऊन यावे व सर्व इस्राएल समुदायाला एकत्र करावे.

  20. गणना ८:१०सुमारे इ.स.पू. १४९०

    लेव्यांना याहवेहपुढे सादर करावे व इस्राएली लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावेत.

  21. गणना ८:११सुमारे इ.स.पू. १४९०

    अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”

  22. गणना ८:१२सुमारे इ.स.पू. १४९०

    मग लेव्यांनी गोर्‍ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्‍हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा.

  23. गणना ८:१३सुमारे इ.स.पू. १४९०

    मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे.

  24. गणना ८:१४सुमारे इ.स.पू. १४९०

    अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील.

  25. गणना ८:१५सुमारे इ.स.पू. १४९०

    तू लेवींना शुद्ध करून हेलावणीचे अर्पण म्हणून मला सादर केल्यानंतर, त्यांनी आपले काम करण्याकरिता सभामंडपात यावे.