- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना ८:१६सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे.
- गणना ८:१७सुमारे इ.स.पू. १४९०
इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे.
- गणना ८:१८सुमारे इ.स.पू. १४९०
आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.
- गणना ८:१९सुमारे इ.स.पू. १४९०
मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.
- गणना ८:२०सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले.
- गणना ८:२१सुमारे इ.स.पू. १४९०
लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले.
- गणना ८:२२सुमारे इ.स.पू. १४९०
नंतर लेवी लोक अहरोन व त्याच्या पुत्रांच्या देखरेखीखाली सेवा करण्यासाठी सभामंडपात आले. लेव्यांच्या संबंधी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे त्यांनी केले.
- गणना ८:२३सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेह मोशेला म्हणाले,
- गणना ८:२४सुमारे इ.स.पू. १४९०
“लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे.
- गणना ८:२५सुमारे इ.स.पू. १४९०
पन्नासाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या रोजच्या सेवेतून निवृत्त व्हावे व त्यानंतर काम करू नये.
- गणना ८:२६सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांनी सभामंडपात आपल्या बांधवांना त्यांच्या कार्यात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः काम करू नये. याप्रकारे तू लेवी लोकांची कामे नेमून द्यावी.”
- गणना ९:१सुमारे इ.स.पू. १४९०
इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले,
- गणना ९:२सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांनी नेमलेल्या वेळेस वल्हांडण सण पाळावा.
- गणना ९:३सुमारे इ.स.पू. १४९०
नेमलेल्या वेळेस, म्हणजेच या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी, त्यासंबंधी असलेल्या सर्व विधी नियमानुसार तो सण पाळावा.”
- गणना ९:४सुमारे इ.स.पू. १४९०
तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना वल्हांडणाचा सण पाळावयास सांगितले.
- गणना ९:५सुमारे इ.स.पू. १४९०
त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले.
- गणना ९:६सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.
- गणना ९:७सुमारे इ.स.पू. १४९०
आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?”
- गणना ९:८सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे त्यांना म्हणाला, “तुमच्याविषयी याहवेह काय आज्ञा देतील ते मी जाणून घेईपर्यंत तुम्ही थांबा.”
- गणना ९:९सुमारे इ.स.पू. १४९०
मग याहवेहने मोशेला म्हटले,
- गणना ९:१०सुमारे इ.स.पू. १४९०
“इस्राएली लोकांना सांग: ‘जर तुमच्यातील किंवा तुमच्या गोत्रातील कोणी मृत देहामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला, त्यांनी तरीही याहवेहसाठी वल्हांडण सण पाळावा,
- गणना ९:११सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु त्यांनी तो दुसर्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर व कडू पाल्याबरोबर वल्हांडणाचे कोकरू खावे.
- गणना ९:१२सुमारे इ.स.पू. १४९०
त्यांनी दुसर्या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत.
- गणना ९:१३सुमारे इ.स.पू. १४९०
पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल.
- गणना ९:१४सुमारे इ.स.पू. १४९०
“ ‘तुमच्यामध्ये राहत असणार्या परदेशी व्यक्तीनेही विधी नियमानुसार याहवेहचा वल्हांडण पाळावा. परदेशी व स्वदेशी व्यक्तीसाठी सारखाच नियम असावा.’ ”