मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह २:२०सुमारे इ.स.पू. ७५९

    त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.

  2. यशायाह २:२१सुमारे इ.स.पू. ७५९

    जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.

  3. यशायाह २:२२सुमारे इ.स.पू. ७५९

    मर्त्य मनुष्यांवर भरवसा करणे बंद कर ज्यांच्या नाकामध्ये केवळ एक श्वासच आहे. त्यांना इतका बहुमान का द्यावा?

  4. यशायाह ३:१सुमारे इ.स.पू. ७५९

    आता बघा, प्रभू सर्वसमर्थ याहवेह यरुशलेम व यहूदीयाचा अन्नपुरवठा आणि पाठिंबा दोन्हीही बंद करणार आहेत— सर्व अन्नाचा पुरवठा आणि पाण्याचा पुरवठा,

  5. यशायाह ३:२सुमारे इ.स.पू. ७५९

    वीर योद्धे तथा सैनिक, न्यायाधीश आणि संदेष्टे, दैवप्रश्न करणारे आणि वडीलजन,

  6. यशायाह ३:३सुमारे इ.स.पू. ७५९

    पन्नास लोकांवर असलेला सेनाधिकारी आणि उच्च पदाधिकारी, सल्लागार, कुशल कारागीर आणि धूर्त मांत्रिक या सर्वांसहित अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा ते काढून घेणार आहेत.

  7. यशायाह ३:४सुमारे इ.स.पू. ७५९

    “मी किशोर मुलांना त्यांचा अधिकारी बनवेन; बालके त्यांच्यावर राज्य करतील.”

  8. यशायाह ३:५सुमारे इ.स.पू. ७५९

    लोक एकमेकांवर अत्याचार करतील— पुरुषा विरुद्ध पुरुष, शेजाऱ्याविरुद्ध शेजारी. तरुण वृद्ध लोकांच्या विरोधात उठतील, मान्यवरांच्या विरोधात तुच्छ लोक उठतील.

  9. यशायाह ३:६सुमारे इ.स.पू. ७५९

    एखादा मनुष्य, आपल्या पित्याच्या घरात, आपल्या भावास धरून म्हणेल, “भाऊ, तुझ्याकडे अंगरखा आहे, तर तू आमचा पुढारी हो; या नासाडीच्या ढिगाऱ्याचा ताबा घे!”

  10. यशायाह ३:७सुमारे इ.स.पू. ७५९

    पण त्या दिवशी तो ओरडेल, “माझ्याकडे त्याचा इलाज नाही. माझ्या घरी अन्न किंवा वस्त्रे नाहीत; मला लोकांचा पुढारी बनवू नका.”

  11. यशायाह ३:८सुमारे इ.स.पू. ७५९

    यरुशलेम डगमगत आहे, यहूदीया कोसळत आहे; त्यांचे बोलणे आणि कृत्ये याहवेहच्या विरोधात आहेत, त्यांच्या गौरवशाली उपस्थितीला त्यांनी विरोध केला.

  12. यशायाह ३:९सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्याच विरोधात साक्ष देतात; त्यांच्या पापांचे ते सदोम नगरीप्रमाणे प्रदर्शन करतात; ते लपवित नाहीत. त्यांचा धिक्कार असो! त्यांनीच स्वतःवर आपत्ती ओढवून घेतली आहे.

  13. यशायाह ३:१०सुमारे इ.स.पू. ७५९

    परंतु नीतिमानास सांगा त्यांना सुस्थिती येईल. त्यांच्या सत्कृत्यांचे त्यांना प्रतिफळ मिळेल.

  14. यशायाह ३:११सुमारे इ.स.पू. ७५९

    दुष्टांचा धिक्कार असो! अरिष्ट त्यांच्यावर येत आहे! त्यांनी केलेल्या कृत्याचा, त्यांना मोबदला मिळणार.

  15. यशायाह ३:१२सुमारे इ.स.पू. ७५९

    तरुण माझ्या लोकांवर अत्याचार करतात, स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे मार्गदर्शक तुमची दिशाभूल करतात; ते तुम्हाला पथभ्रष्ट करतात.

  16. यशायाह ३:१३सुमारे इ.स.पू. ७५९

    याहवेह त्यांच्या न्यायसभेत स्थानापन्न होतात; ते लोकांचा न्याय करण्यासाठी उभे राहतात.

  17. यशायाह ३:१४सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.

  18. यशायाह ३:१५सुमारे इ.स.पू. ७५९

    माझ्या लोकांना चिरडण्याचे व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?” प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

  19. यशायाह ३:१६सुमारे इ.स.पू. ७५९

    याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.

  20. यशायाह ३:१७सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.”

  21. यशायाह ३:१८सुमारे इ.स.पू. ७५९

    त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार,

  22. यशायाह ३:१९सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण,

  23. यशायाह ३:२०सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत,

  24. यशायाह ३:२१सुमारे इ.स.पू. ७५९

    अंगठ्या आणि नथण्या,

  25. यशायाह ३:२२सुमारे इ.स.पू. ७५९

    उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे,