मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ५:१६सुमारे इ.स.पू. ७५९

    परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील, आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील.

  2. यशायाह ५:१७सुमारे इ.स.पू. ७५९

    तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील; श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील.

  3. यशायाह ५:१८सुमारे इ.स.पू. ७५९

    धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.

  4. यशायाह ५:१९सुमारे इ.स.पू. ७५९

    धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, म्हणजे आम्हाला ती कळेल.”

  5. यशायाह ५:२०सुमारे इ.स.पू. ७५९

    धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात आणि चांगल्याला वाईट म्हणतात, जे अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार, जे गोड त्याला कडू आणि कडू त्याला गोड असे म्हणतात.

  6. यशायाह ५:२१सुमारे इ.स.पू. ७५९

    धिक्कार असो, जे स्वतःच्या दृष्टीत शहाणे आहेत आणि स्वतःच्या नजरेत हुशार आहेत.

  7. यशायाह ५:२२सुमारे इ.स.पू. ७५९

    धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,

  8. यशायाह ५:२३सुमारे इ.स.पू. ७५९

    लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.

  9. यशायाह ५:२४सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.

  10. यशायाह ५:२५सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. पर्वत डगमगतात, आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  11. यशायाह ५:२६सुमारे इ.स.पू. ७५९

    दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!

  12. यशायाह ५:२७सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.

  13. यशायाह ५:२८सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात, त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात.

  14. यशायाह ५:२९सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.

  15. यशायाह ५:३०सुमारे इ.स.पू. ७५९

    त्या दिवशी ते त्याच्यावर समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.

  16. यशायाह ६:१सुमारे इ.स.पू. ७५९

    उज्जीयाह राजा मरण पावला त्या वर्षी, मी प्रभूला सिंहासनावर बसलेले उच्चतम आणि गौरवी असे पाहिले; आणि त्यांच्या अंगरख्याच्या घोळाने मंदिर भरून गेले होते.

  17. यशायाह ६:२सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांच्या वरच्या बाजूला सराफीम होते, प्रत्येकाला सहा पंख होते: दोन पंखांनी त्यांनी स्वतःचे मुख झाकले होते, दोन पंखांनी पाय झाकले होते आणि दोन पंखांनी ते उडत होते.

  18. यशायाह ६:३सुमारे इ.स.पू. ७५९

    आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”

  19. यशायाह ६:४सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले.

  20. यशायाह ६:५सुमारे इ.स.पू. ७५९

    “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

  21. यशायाह ६:६सुमारे इ.स.पू. ७५९

    नंतर, सराफीम दूतांपैकी एकाने, वेदीवरील एक निखारा चिमट्याने उचलला व तो उडत माझ्याकडे आला.

  22. यशायाह ६:७सुमारे इ.स.पू. ७५९

    माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.”

  23. यशायाह ६:८सुमारे इ.स.पू. ७५९

    नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!”

  24. यशायाह ६:९सुमारे इ.स.पू. ७५९

    ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’

  25. यशायाह ६:१०सुमारे इ.स.पू. ७५९

    या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”