- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- यशायाह ६:११सुमारे इ.स.पू. ७५९
नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.
- यशायाह ६:१२सुमारे इ.स.पू. ७५९
याहवेह सर्व लोकांना दूर पाठवून देईपर्यंत आणि देशाचा पूर्णपणे त्याग केला जाईपर्यंत.
- यशायाह ६:१३सुमारे इ.स.पू. ७५९
आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी, तो पुन्हा उद्ध्वस्त होईल. परंतु जसे एला आणि अल्लोन जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो, त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.”
- यशायाह ७:१सुमारे इ.स.पू. ७४१
जेव्हा यहूदीयाचा राजा आहाज, जो योथामचा पुत्र, जो उज्जीयाहचा पुत्र होता, अरामचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहने यरुशलेमवर हल्ला केला, परंतु त्यांच्यावर ते विजय मिळवू शकले नाहीत.
- यशायाह ७:२सुमारे इ.स.पू. ७४१
आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.
- यशायाह ७:३सुमारे इ.स.पू. ७४१
तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.
- यशायाह ७:४सुमारे इ.स.पू. ७४१
आहाजाला सांग, ‘सावध राहा, शांत राहा आणि घाबरू नकोस. जळाऊ लाकडाच्या या दोन धुरकट थोटकामुळे अंतःकरण खचून देऊ नको—रसीन आणि अराम आणि रमाल्याहच्या पुत्राच्या भयंकर रागामुळे अंतःकरण खचू देऊ नको.
- यशायाह ७:५सुमारे इ.स.पू. ७४१
अराम, एफ्राईम आणि रमाल्याहच्या पुत्राने असे म्हणून तुमच्या नाशाचा कट रचला आहे,
- यशायाह ७:६सुमारे इ.स.पू. ७४१
“चला, आपण यहूदीयावर हल्ला करू; चला आपण ते तोडून त्याचे तुकडे करू आणि आपसात वाटून ते घेऊ आणि ताबीलच्या पुत्राला त्यावर राजा बनवू.”
- यशायाह ७:७सुमारे इ.स.पू. ७४१
तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तसे होणार नाही, तसे घडणार नाही,
- यशायाह ७:८सुमारे इ.स.पू. ७४१
कारण दिमिष्क हे अरामाचे मस्तक आहे, आणि दिमिष्क हे केवळ रसीनचे मस्तक. पासष्ट वर्षांच्या आतच एफ्राईम असे हादरून जाईल की ते सर्व एककूळ म्हणून राहू शकणार नाहीत.
- यशायाह ७:९सुमारे इ.स.पू. ७४१
एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”
- यशायाह ७:१०सुमारे इ.स.पू. ७४१
पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले,
- यशायाह ७:११सुमारे इ.स.पू. ७४१
“याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.”
- यशायाह ७:१२सुमारे इ.स.पू. ७४१
परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.”
- यशायाह ७:१३सुमारे इ.स.पू. ७४१
तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का?
- यशायाह ७:१४सुमारे इ.स.पू. ७४१
म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
- यशायाह ७:१५सुमारे इ.स.पू. ७४१
जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल,
- यशायाह ७:१६सुमारे इ.स.पू. ७४१
कारण त्या मुलाला अयोग्य नाकारणे आणि योग्य निवडणे हे पुरेसे माहीत होण्याआधीच, ज्या दोन देशाच्या राजांची तुम्हाला भीती वाटत आहे ते नष्ट केले जातील.
- यशायाह ७:१७सुमारे इ.स.पू. ७४१
एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”
- यशायाह ७:१८सुमारे इ.स.पू. ७४१
त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील.
- यशायाह ७:१९सुमारे इ.स.पू. ७४१
ते सर्व येतील आणि उतरत्या खोल दऱ्यांमध्ये, खडकांच्या कपाऱ्यांमध्ये, सर्व काटेरी झुडूपांवर आणि पाण्याच्या सर्व झऱ्यांवर वस्ती करतील.
- यशायाह ७:२०सुमारे इ.स.पू. ७४१
त्या दिवशी प्रभू फरात नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील.
- यशायाह ७:२१सुमारे इ.स.पू. ७४१
त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.
- यशायाह ७:२२सुमारे इ.स.पू. ७४१
आणि ते भरपूर दूध देत असल्यामुळे खाण्यासाठी तिथे दही असेल. त्या देशात जे सर्व राहतील ते दही आणि मध खातील.