मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह ३:२३सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.

  2. यशायाह ३:२४सुमारे इ.स.पू. ७५९

    सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल; कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल; नीट केशरचनेऐवजी टक्कल; उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट; आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील.

  3. यशायाह ३:२५सुमारे इ.स.पू. ७५९

    तुमचे पुरुष तलवारीने पडतील, तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,

  4. यशायाह ३:२६सुमारे इ.स.पू. ७५९

    सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.

  5. यशायाह ४:१सुमारे इ.स.पू. ७५९

    त्या दिवसात सात स्त्रिया एका पुरुषास धरून असे म्हणतील “आम्ही स्वतःचे अन्न मिळवू आणि स्वतःचे वस्त्र मिळवू; आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!”

  6. यशायाह ४:२सुमारे इ.स.पू. ७५९

    त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.

  7. यशायाह ४:३सुमारे इ.स.पू. ७५९

    सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील.

  8. यशायाह ४:४सुमारे इ.स.पू. ७५९

    प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील.

  9. यशायाह ४:५सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल.

  10. यशायाह ४:६सुमारे इ.स.पू. ७५९

    दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.

  11. यशायाह ५:१सुमारे इ.स.पू. ७५९

    माझी ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: सुपीक डोंगराळ भागावर माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.

  12. यशायाह ५:२सुमारे इ.स.पू. ७५९

    त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.

  13. यशायाह ५:३सुमारे इ.स.पू. ७५९

    “आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.

  14. यशायाह ५:४सुमारे इ.स.पू. ७५९

    माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?

  15. यशायाह ५:५सुमारे इ.स.पू. ७५९

    आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.

  16. यशायाह ५:६सुमारे इ.स.पू. ७५९

    मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”

  17. यशायाह ५:७सुमारे इ.स.पू. ७५९

    इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.

  18. यशायाह ५:८सुमारे इ.स.पू. ७५९

    तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.

  19. यशायाह ५:९सुमारे इ.स.पू. ७५९

    माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे: “मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील, उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल.

  20. यशायाह ५:१०सुमारे इ.स.पू. ७५९

    दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”

  21. यशायाह ५:११सुमारे इ.स.पू. ७५९

    जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!

  22. यशायाह ५:१२सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.

  23. यशायाह ५:१३सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.

  24. यशायाह ५:१४सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, त्याचे तोंड मोठे करून उघडतो. त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.

  25. यशायाह ५:१५सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.