मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यशायाह १:२६सुमारे इ.स.पू. ७५९

    मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. त्यानंतर तुम्हाला, धार्मिकतेचे शहर, विश्वासू शहर असे म्हटले जाईल.”

  2. यशायाह १:२७सुमारे इ.स.पू. ७५९

    सीयोन न्यायाने, आणि तिचे पश्चात्तापकर्त्ये नीतिमत्त्वाने सोडविले जातील.

  3. यशायाह १:२८सुमारे इ.स.पू. ७५९

    परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल.

  4. यशायाह १:२९सुमारे इ.स.पू. ७५९

    “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले, त्या एलाच्या पवित्र वृक्षाबद्दल तुम्ही लज्जित व्हाल; ज्यांची तुम्ही निवड केली आहे त्या बागांमुळे तुमचा अपमान केला जाईल.

  5. यशायाह १:३०सुमारे इ.स.पू. ७५९

    तुम्ही पाने कोमेजून गेलेल्या एलावृक्षासारखी, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.

  6. यशायाह १:३१सुमारे इ.स.पू. ७५९

    पराक्रमी मनुष्य चकमकीसारखा होईल, आणि त्याचे काम ठिणगी असे होईल; दोघेही एकत्र जळतील, ती आग विझविणारे कोणीही नसेल.”

  7. यशायाह २:१सुमारे इ.स.पू. ७५९

    यहूदीया व यरुशलेमविषयी आमोजाचा पुत्र यशायाहने पाहिलेला दृष्टान्त:

  8. यशायाह २:२सुमारे इ.स.पू. ७५९

    पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.

  9. यशायाह २:३सुमारे इ.स.पू. ७५९

    अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  10. यशायाह २:४सुमारे इ.स.पू. ७५९

    ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  11. यशायाह २:५सुमारे इ.स.पू. ७५९

    याकोबाच्या वंशजा ये, आपण याहवेहच्या प्रकाशात चालू.

  12. यशायाह २:६सुमारे इ.स.पू. ७५९

    याहवेह, तुम्ही याकोबाच्या वंशजाचा तुमच्या लोकांचा त्याग केला आहे, ते पूर्वेकडील अंधश्रद्धेने भरून गेलेले आहेत; पलिष्टी लोकांप्रमाणे ते दुरात्म्यांशी संपर्क साधतात आणि मूर्तिपूजकांच्या रूढी त्यांनी स्वीकारल्या आहेत.

  13. यशायाह २:७सुमारे इ.स.पू. ७५९

    त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे; त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत. त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत; त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत.

  14. यशायाह २:८सुमारे इ.स.पू. ७५९

    सर्व भूमी मूर्तीनी भरली आहे; त्यांच्याच हस्तकृतींनी, जे त्यांच्या बोटांनी बनविले आहे, त्याला ते नमन करतात.

  15. यशायाह २:९सुमारे इ.स.पू. ७५९

    म्हणून या लोकांचे पतन केले जाईल आणि सर्वजण नमविले जातील— त्यांना क्षमा करू नका.

  16. यशायाह २:१०सुमारे इ.स.पू. ७५९

    याहवेहच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास कड्याकपारीत जा, जमिनीत लपून बसा!

  17. यशायाह २:११सुमारे इ.स.पू. ७५९

    उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.

  18. यशायाह २:१२सुमारे इ.स.पू. ७५९

    गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—

  19. यशायाह २:१३सुमारे इ.स.पू. ७५९

    लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,

  20. यशायाह २:१४सुमारे इ.स.पू. ७५९

    उंच उंच पर्वत आणि सर्व उंच डोंगर,

  21. यशायाह २:१५सुमारे इ.स.पू. ७५९

    प्रत्येक भव्य बुरूज, प्रत्येक तटबंदीची भिंत,

  22. यशायाह २:१६सुमारे इ.स.पू. ७५९

    तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील.

  23. यशायाह २:१७सुमारे इ.स.पू. ७५९

    मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.

  24. यशायाह २:१८सुमारे इ.स.पू. ७५९

    सर्व मूर्तीचा समूळ उच्छेद होईल.

  25. यशायाह २:१९सुमारे इ.स.पू. ७५९

    जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.