- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 1 राजे ५:१५सुमारे इ.स.पू. १०१४
डोंगराळ प्रदेशात शलोमोनचे सत्तर हजार ओझी वाहणारे आणि ऐंशी हजार दगड घडविणारे होते,
- 1 राजे ५:१६सुमारे इ.स.पू. १०१४
त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत.
- 1 राजे ५:१७सुमारे इ.स.पू. १०१४
राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले.
- 1 राजे ५:१८सुमारे इ.स.पू. १०१४
शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली.
- 1 राजे ६:१सुमारे इ.स.पू. १०११
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
- 1 राजे ६:२सुमारे इ.स.पू. १०११
शलोमोन राजाने याहवेहसाठी जे मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात आणि उंची तीस हात होती.
- 1 राजे ६:३सुमारे इ.स.पू. १०११
मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरच्या वर्हांड्याची रुंदी मंदिराच्या रुंदीएवढीच, म्हणजेच वीस हात होती, मंदिराच्या समोरील बाजूने त्याची रुंदी दहा हात होती.
- 1 राजे ६:४सुमारे इ.स.पू. १०११
त्यांनी मंदिराच्या वरील बाजूच्या भिंतींमध्ये अरुंद खिडक्या बनविल्या.
- 1 राजे ६:५सुमारे इ.स.पू. १०११
मुख्य खोली तसेच पवित्रस्थानाच्या आतील बाजूस त्याने मजले बांधले व त्यात खोल्या केल्या.
- 1 राजे ६:६सुमारे इ.स.पू. १०११
सर्वात खालचा मजला पाच हात रुंद, मधला मजला सहा हात आणि तिसरा मजला सात हात. त्याने मंदिराच्या बाहेरील बाजूस तोडे ठेवले म्हणजे मंदिराच्या भिंतींच्या पार काहीही घुसविले जावू नये.
- 1 राजे ६:७सुमारे इ.स.पू. १०११
मंदिराच्या बांधकामासाठी खाणीतूनच तयार केलेले दगड वापरण्यात आले होते आणि मंदिर बांधले जात असताना हातोडी, कुर्हाड किंवा इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिराच्या परिसरात ऐकू आला नव्हता.
- 1 राजे ६:८सुमारे इ.स.पू. १०११
तळमजल्याचे प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिणेस होते; तिथून मधल्या मजल्यापर्यंत आणि तिथून पुढे तिसर्या मजल्यापर्यंत एक जिना होता.
- 1 राजे ६:९सुमारे इ.स.पू. १०११
त्याने गंधसरूच्या लाकडाच्या तुळया टाकून छप्पर टाकून, मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
- 1 राजे ६:१०सुमारे इ.स.पू. १०११
आणि त्याने मंदिराच्या सभोवतीच्या बाजूने पाच हात उंचीच्या खोल्या बांधल्या व त्या प्रत्येक खोली गंधसरूच्या तुळयांनी मंदिराशी जोडली.
- 1 राजे ६:११सुमारे इ.स.पू. १०११
तेव्हा याहवेहचे वचन शलोमोनकडे आले:
- 1 राजे ६:१२सुमारे इ.स.पू. १०११
“तू बांधत असलेले हे जे मंदिर आहे त्याबाबत, जर तू माझ्या विधींचे अनुसरण केले, माझे नियम पाळले व माझ्या आज्ञा मानून त्यांचे पालन केले तर, तुझा पिता दावीदाला दिलेल्या अभिवचनांची मी तुझ्याद्वारे पूर्तता करेन.
- 1 राजे ६:१३सुमारे इ.स.पू. १०११
आणि मी इस्राएली लोकांमध्ये राहीन आणि माझे लोक इस्राएल यांना मी सोडणार नाही.”
- 1 राजे ६:१४सुमारे इ.स.पू. १०११
शलोमोनने मंदिर बांधून पूर्ण केले.
- 1 राजे ६:१५सुमारे इ.स.पू. १०११
त्याने मंदिराच्या आतील भिंतींना, जमिनीपासून छप्परापर्यंत गंधसरूच्या पट्ट्या लावल्या व जमिनीला गंधसरूच्या फळ्या केल्या.
- 1 राजे ६:१६सुमारे इ.स.पू. १०११
मंदिरामध्येच पवित्रस्थान व परमपवित्रस्थान असावे म्हणून मंदिराच्या मागील बाजूला जमिनीपासून छप्परापर्यंत देवदारूच्या फळ्या लावून त्याने तो वेगळा केला.
- 1 राजे ६:१७सुमारे इ.स.पू. १०११
या खोलीच्या समोरची मुख्य खोली चाळीस हात लांब होती.
- 1 राजे ६:१८सुमारे इ.स.पू. १०११
मंदिराचा आतील भाग गंधसरूचा होता व त्यावर कळ्या व उमललेली फुले कोरली होती. दगड दृष्टीस पडू नये, म्हणून सर्वकाही गंधसरूचे बनविले गेले होते.
- 1 राजे ६:१९सुमारे इ.स.पू. १०११
याहवेहच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने मंदिराच्या आतील भागात पवित्रस्थान बनविले.
- 1 राजे ६:२०सुमारे इ.स.पू. १०११
आतील पवित्रस्थान वीस हात लांब, वीस हात रुंद व वीस हात उंच होते. त्याच्या आतील भागावर व गंधसरूच्या वेदीला त्याने शुद्ध सोन्याचे आवरण दिले होते.
- 1 राजे ६:२१सुमारे इ.स.पू. १०११
शलोमोनने मंदिराच्या आतील भागाला शुद्ध सोन्याचे आच्छादन घातले, आणि पवित्रस्थानाच्या समोरून आतील बाजूने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या, व त्यांना देखील सोन्याचे आवरण दिले.