मुख्य मजकुरावर जा

circa 970–930 BC

Solomon & The Temple

Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.

635 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 1 राजे ६:२२सुमारे इ.स.पू. १०११

    अशाप्रकारे त्याने संपूर्ण मंदिर सोन्याने मढविले. आतील पवित्रस्थानातील वेदीला सुद्धा त्याने सोन्याचे आवरण दिले.

  2. 1 राजे ६:२३सुमारे इ.स.पू. १०११

    आतील पवित्रस्थानासाठी त्याने जैतून लाकडाचे दोन करूब तयार केले. प्रत्येक दहा हात उंच होते.

  3. 1 राजे ६:२४सुमारे इ.स.पू. १०११

    पहिल्या करुबाचे एक पंख पाच हात आणि दुसरे पंख पाच हात लांब होते; एका पंखाच्या टोकापासून दुसर्‍या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.

  4. 1 राजे ६:२५सुमारे इ.स.पू. १०११

    दुसरा करूब सुद्धा दहा हाताच्या मापाचा होता, कारण दोन्ही करूब एकसारख्याच मापाचे व आकाराचे होते.

  5. 1 राजे ६:२६सुमारे इ.स.पू. १०११

    प्रत्येक करुबाची उंची दहा हात होती.

  6. 1 राजे ६:२७सुमारे इ.स.पू. १०११

    त्याने ते करूब, त्यांचे पंख पसरलेले असे मंदिराच्या अगदी आतील खोलीत ठेवले. एका करुबाचे पंख एका भिंतीला स्पर्श करत होते, तर दुसऱ्या करुबाचे पंख दुसर्‍या भिंतीला स्पर्श करत होते आणि त्यांचे पंख खोलीच्या मध्यभागी एकमेकांना स्पर्श करत होते.

  7. 1 राजे ६:२८सुमारे इ.स.पू. १०११

    त्याने करुबांना सोन्याचे आवरण दिले.

  8. 1 राजे ६:२९सुमारे इ.स.पू. १०११

    मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या भिंतीवर सभोवार करूब, खजुरीची झाडे व उमललेली फुले कोरली होती.

  9. 1 राजे ६:३०सुमारे इ.स.पू. १०११

    त्याने मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या जमिनीला सुद्धा सोन्याचे आवरण दिले.

  10. 1 राजे ६:३१सुमारे इ.स.पू. १०११

    मंदिराच्या आतील प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाचे दरवाजे बनविले, ज्यांची रुंदी पवित्रस्थानाच्या पाचव्या भागाइतकी होती.

  11. 1 राजे ६:३२सुमारे इ.स.पू. १०११

    त्यातील जैतून लाकडाच्या दोन दारांवर सोन्याचे ठोकलेले करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली.

  12. 1 राजे ६:३३सुमारे इ.स.पू. १०११

    त्याच प्रकारे, मुख्य खोलीच्या प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाच्या कपाळपट्ट्या बनविल्या ज्यांची रुंदी भिंतीच्या चौथ्या भागाइतकी होती.

  13. 1 राजे ६:३४सुमारे इ.स.पू. १०११

    त्याने देवदारू लाकडाचे सुद्धा दोन दरवाजे बनविले, जे दोन्ही बाजूंनी दुमडले जात होते.

  14. 1 राजे ६:३५सुमारे इ.स.पू. १०११

    त्यावरही त्याने एकसारखे ठोकलेल्या सोन्याचे काम करून करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली.

  15. 1 राजे ६:३६सुमारे इ.स.पू. १०११

    आणि त्याने आतील अंगणात वळणदार दगडांच्या तीन रांगा आणि छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग बनविली.

  16. 1 राजे ६:३७सुमारे इ.स.पू. १०११

    चौथ्या वर्षी, सीव महिन्यात याहवेहच्या मंदिराचा पाया घातला गेला.

  17. 1 राजे ६:३८सुमारे इ.स.पू. १०११

    अकराव्या वर्षी, आठव्या महिन्यात; म्हणजे बूल महिन्यात, त्याच्या तपशील व नमुन्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम संपले. शलोमोनला मंदिर बांधण्यासाठी सात वर्षे लागली.

  18. शलोमोनच्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी तेरा वर्षे लागली.

  19. त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या.

  20. त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते.

  21. त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या.

  22. सर्व दरवाजांना चौकट बाह्या होत्या; त्या समोरच्या बाजूने समोरासमोर तीन अशा जोडीने होत्या.

  23. त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते.

  24. त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले.

  25. आणि ज्या राजवाड्यात तो राहणार त्याची रचना याच खोलीप्रमाणे होती. फारोहच्या ज्या कन्येशी त्याने विवाह केला होता तिच्यासाठी सुद्धा शलोमोनने याच खोलीसारखा राजवाडा बनविला.