- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 970–930 BC
Solomon & The Temple
Solomon builds the great Temple in Jerusalem and rules with unprecedented wisdom and wealth before foreign gods divide his heart.
या कालखंडातील वचने
- 1 राजे ३:२७सुमारे इ.स.पू. १०१४
तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”
- 1 राजे ३:२८सुमारे इ.स.पू. १०१४
राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.
- 1 राजे ४:१सुमारे इ.स.पू. १०१४
शलोमोन राजाने सर्व इस्राएलवर राज्य केले.
- 1 राजे ४:२सुमारे इ.स.पू. १०१४
हे सर्व मुख्य अधिकारी होते: सादोकाचा पुत्र अजर्याह याजक;
- 1 राजे ४:३सुमारे इ.स.पू. १०१४
शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा;
- 1 राजे ४:४सुमारे इ.स.पू. १०१४
यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, मुख्य सेनापती होता; सादोक व अबीयाथार, हे याजक होते.
- 1 राजे ४:५सुमारे इ.स.पू. १०१४
नाथानचा पुत्र अजर्याह, हा राज्याधिकार्यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता;
- 1 राजे ४:६सुमारे इ.स.पू. १०१४
अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता.
- 1 राजे ४:७सुमारे इ.स.पू. १०१४
शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.
- 1 राजे ४:८सुमारे इ.स.पू. १०१४
त्यांची नावे ही होती: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता;
- 1 राजे ४:९सुमारे इ.स.पू. १०१४
बेन-देकेर हा माकाज, शालब्बीम, बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर होता.
- 1 राजे ४:१०सुमारे इ.स.पू. १०१४
बेन-हेसेद हा अरुब्बोथवर होता (सोकोह आणि हेफेरचा सर्व प्रदेश त्याच्याकडे होता);
- 1 राजे ४:११सुमारे इ.स.पू. १०१४
बेन-अबीनादाब हा नाफोथ दोर यावर (शलोमोनची कन्या ताफाथ हिच्याशी त्याचा विवाह झाला होता);
- 1 राजे ४:१२सुमारे इ.स.पू. १०१४
अहीलुदचा पुत्र बाअनाकडे तानख व मगिद्दो आणि येज्रीलखाली असलेल्या सारेथान जवळील बेथ-शानपर्यंत सर्व प्रदेश, तसेच बेथ-शानपासून योकमेअम पर्यंतचा आबेल-महोलाहचा प्रदेश;
- 1 राजे ४:१३सुमारे इ.स.पू. १०१४
बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती);
- 1 राजे ४:१४सुमारे इ.स.पू. १०१४
इद्दोचा पुत्र अहीनादाबकडे महनाईम.
- 1 राजे ४:१५सुमारे इ.स.पू. १०१४
अहीमाजकडे नफताली होते (त्याने शलोमोनची कन्या बासमाथ हिच्याशी विवाह केला होता);
- 1 राजे ४:१६सुमारे इ.स.पू. १०१४
हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर;
- 1 राजे ४:१७सुमारे इ.स.पू. १०१४
पारुआहचा पुत्र यहोशाफाट हा इस्साखारमध्ये होता;
- 1 राजे ४:१८सुमारे इ.स.पू. १०१४
एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.
- 1 राजे ४:१९सुमारे इ.स.पू. १०१४
उरीचा पुत्र गेबेर हा गिलआद प्रांतावर (अमोर्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांचा प्रदेश). त्या जिल्ह्यावर तो एकटाच अधिकारी होता.
- 1 राजे ४:२०सुमारे इ.स.पू. १०१४
इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांची संख्या समुद्र किनार्यावरील वाळू इतकी अगणित होती. ते खाऊन पिऊन मजेत होते.
- 1 राजे ४:२१सुमारे इ.स.पू. १०१४
आणि फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि पुढे खाली इजिप्तच्या हद्दीपर्यंत या सर्व राज्यांवर शलोमोनचे राज्य होते. या सर्व राष्ट्रांनी शलोमोनला कर दिला व शलोमोनच्या सर्व आयुष्यभर ते त्याच्या अधीन राहिले.
- 1 राजे ४:२२सुमारे इ.स.पू. १०१४
शलोमोनचा रोजचा पुरवठा तीस कोर सपीठ व साठ कोर पीठ,
- 1 राजे ४:२३सुमारे इ.स.पू. १०१४
गोठ्यात चारलेले दहा बैल, कुरणात चरणारे वीस बैल आणि शंभर मेंढरे व बोकडे, याशिवाय हरिण, सांबरे, भेकरे आणि पुष्ट पक्षी.