मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २२:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    “जर कोणी आपले गाढव, बैल, मेंढरू किंवा कोणतेही जनावर आपल्या शेजार्‍याकडे सुरक्षित राहावे म्हणून ठेवले आणि ते मेले किंवा त्याला काही इजा झाली किंवा त्याच्यावर नजर नसताना त्याला कोणी घेऊन गेले,

  2. निर्गम २२:११सुमारे इ.स.पू. १४९१

    तर शेजार्‍याने दुसर्‍याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही.

  3. निर्गम २२:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    पण ते जनावर जर शेजार्‍याकडून चोरीला गेले, तर त्याने मालकाला भरपाई करून द्यावे.

  4. निर्गम २२:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    जर एखाद्या जंगली श्वापदाने ते जनावर फाडून टाकले, तर त्या शेजार्‍याने त्या जनावराचे पार्श्वशरीर पुरावा म्हणून समोर आणावे आणि त्या फाडलेल्या जनावराची फेड करून देऊ नये.

  5. निर्गम २२:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    “जर कोणी आपल्या शेजार्‍याकडून जनावर उसने घेतो व जनावराचा मालक तिथे नसताना ते जनावर जखमी झाले किंवा मेले, तर त्याने त्याची भरपाई त्याला द्यावी.

  6. निर्गम २२:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    पण मालक जनावराबरोबर असला, तर भाडेकरूने त्याची भरपाई करू नये. जर त्याने ते भाड्याने घेतले असेल, तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.

  7. निर्गम २२:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    “जर एखादा मनुष्य मागणी न झालेल्या कुमारीला भुलवितो आणि तिचा विनयभंग करतो, तर त्याने वधूकिंमत द्यावी आणि ती त्याची पत्नी होईल.

  8. निर्गम २२:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    पण जर तिच्या वडिलांनी ती त्याला देण्यास नाकारले, तरीही त्याने कुमारिकेची वधूकिंमत द्यावी.

  9. निर्गम २२:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    “चेटकिणीला मुळीच जिवंत राहू देऊ नये.

  10. निर्गम २२:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    “पशुशी लैंगिक संबंध करणार्‍याला अवश्य जिवे मारावे.

  11. निर्गम २२:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    “याहवेह परमेश्वराशिवाय इतर दैवतांना अर्पणे करणार्‍यांचा नाश करून टाकावा.

  12. निर्गम २२:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    “परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.

  13. निर्गम २२:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.

  14. निर्गम २२:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

  15. निर्गम २२:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

  16. निर्गम २२:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

  17. निर्गम २२:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,

  18. निर्गम २२:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे.

  19. निर्गम २२:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुम्ही परमेश्वराची निंदा करू नये किंवा तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला शाप देऊ नये.

  20. निर्गम २२:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    “आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा.

  21. निर्गम २२:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे.

  22. निर्गम २२:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुम्ही माझे पवित्र लोक असावे. यास्तव हिंस्र श्वापदाने मारून टाकलेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये; ते तुम्ही कुत्र्यांना घालावे.

  23. निर्गम २३:१सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये.

  24. निर्गम २३:२सुमारे इ.स.पू. १४९१

    “दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका,

  25. निर्गम २३:३सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये.