- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम २०:२२सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांस हे सांग: ‘मी तुमच्याशी स्वर्गातून बोललो हे तुम्ही स्वतः पाहिले आहे:
- निर्गम २०:२३सुमारे इ.स.पू. १४९१
माझ्या खेरीज इतर कोणतेही देव बनवू नका; तुमच्यासाठी चांदीच्या किंवा सोन्याच्या मूर्त्या बनवू नका.
- निर्गम २०:२४सुमारे इ.स.पू. १४९१
“ ‘माझ्यासाठी मातीची वेदी तयार करा व त्यावर तुमची मेंढरे, बोकडे व तुमचे गुरे चढवून आपली होमार्पणे व शांत्यर्पणे ही अर्पण करा. जिथे कुठे माझ्या नावाचे गौरव व्हावा असे मी ठरवेन, तिथे मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन.
- निर्गम २०:२५सुमारे इ.स.पू. १४९१
तुम्ही माझ्यासाठी जर दगडाची वेदी बांधली, तर त्यासाठी घडविलेले दगड वापरू नयेत. त्यावर कोणतेही हत्यार वापरले तर तुम्ही त्यास विटाळून टाकाल.
- निर्गम २०:२६सुमारे इ.स.पू. १४९१
आपली नग्नता उघडी पडू नये म्हणून माझ्या वेदीवर पायर्या चढून जाऊ नका.’
- निर्गम २१:१सुमारे इ.स.पू. १४९१
“तू त्यांच्यासमोर मांडावयाचे नियम हे आहेत:
- निर्गम २१:२सुमारे इ.स.पू. १४९१
“तुम्ही जर एखादा इब्री गुलाम विकत घेतला, तर त्याने तुमची सहा वर्षे सेवा करावी. परंतु सातव्या वर्षी तो काहीही भरपाई न घेता स्वतंत्र होईल.
- निर्गम २१:३सुमारे इ.स.पू. १४९१
जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल.
- निर्गम २१:४सुमारे इ.स.पू. १४९१
जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल.
- निर्गम २१:५सुमारे इ.स.पू. १४९१
“पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,
- निर्गम २१:६सुमारे इ.स.पू. १४९१
तर त्याच्या मालकाने त्याला न्यायाधीशांसमोर आणावे. मग त्याने त्याला दरवाजाकडे किंवा दरवाजाच्या चौकटीजवळ आणावे व आरीने त्याचा कान टोचावा. यानंतर तो त्याचा जीवनभर गुलाम म्हणून राहील.
- निर्गम २१:७सुमारे इ.स.पू. १४९१
“एखाद्या मनुष्याने आपली मुलगी गुलाम म्हणून विकली, तर पुरुष केले जातात त्याप्रमाणे ती स्वतंत्र केली जाणार नाही.
- निर्गम २१:८सुमारे इ.स.पू. १४९१
ज्याने तिला आपल्यासाठी निवडून घेतले होते, त्या आपल्या मालकाला जर ती संतुष्ट करीत नाही, तर त्याने तिची खंडणी भरून तिला जाऊ द्यावे; तिला परक्याला विकण्याचा त्याला अधिकार नाही, कारण त्याने तिचा विश्वास तोडला आहे.
- निर्गम २१:९सुमारे इ.स.पू. १४९१
पण आपल्या मुलासाठी जर तो तिची निवड करतो, तर त्याने आपल्या मुलीचे हक्क तिला द्यावे.
- निर्गम २१:१०सुमारे इ.स.पू. १४९१
जर तो दुसर्या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये.
- निर्गम २१:११सुमारे इ.स.पू. १४९१
जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.
- निर्गम २१:१२सुमारे इ.स.पू. १४९१
“जर कोणी एखाद्यावर प्राणघातक हल्ला केला तर त्याला मृत्युदंड द्यावा.
- निर्गम २१:१३सुमारे इ.स.पू. १४९१
जरी ते मुद्दाम केलेले नाही, पण परमेश्वरानेच ते घडवून आणले, तर मी नेमलेल्या ठिकाणी त्यांनी पळून जावे.
- निर्गम २१:१४सुमारे इ.स.पू. १४९१
पण कोणी जर कपटाने एखाद्याचा वध केला, तर त्याला माझ्या वेदीकडे नेऊन मृत्युदंड द्यावा.
- निर्गम २१:१५सुमारे इ.स.पू. १४९१
“जे कोणी आपला पिता किंवा आईला जिवे मारतात त्यांना जिवे मारावे.
- निर्गम २१:१६सुमारे इ.स.पू. १४९१
“जो कोणी एखाद्याचे अपहरण करतो त्याला जिवे मारावे, पीडित व्यक्ती त्याच्या ताब्यात असो किंवा कोणाला विकलेली असो.
- निर्गम २१:१७सुमारे इ.स.पू. १४९१
“जो कोणी आपल्या आई किंवा वडिलास शाप देईल त्यास जिवे मारावे.
- निर्गम २१:१८सुमारे इ.स.पू. १४९१
“जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली,
- निर्गम २१:१९सुमारे इ.स.पू. १४९१
आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा.
- निर्गम २१:२०सुमारे इ.स.पू. १४९१
“जो कोणी आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाला काठीने मारेल व त्यामुळे गुलाम मरण पावला, तर त्या धन्याला शिक्षा व्हावी.