- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम १८:२४सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेने आपल्या सासर्याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले.
- निर्गम १८:२५सुमारे इ.स.पू. १४९१
मोशेने संपूर्ण इस्राएलातून सक्षम अशी माणसे निवडली व त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.
- निर्गम १८:२६सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून सेवा केली. अवघड वाद त्यांनी मोशेकडे आणले, परंतु साधेसरळ वाद त्यांनीच सोडविले.
- निर्गम १८:२७सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने आपल्या सासर्याचा निरोप घेतला आणि इथ्रो त्याच्या देशास परत निघून गेला.
- निर्गम १९:१सुमारे इ.स.पू. १४९१
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यावर तिसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी; याच दिवशी ते सीनायच्या रानात आले.
- निर्गम १९:२सुमारे इ.स.पू. १४९१
रफीदीम येथून निघाल्यावर, त्यांनी सीनायच्या रानात प्रवेश केला आणि इस्राएल त्या ठिकाणी रानात पर्वतापुढे तळ देऊन राहिले.
- निर्गम १९:३सुमारे इ.स.पू. १४९१
नंतर मोशे परमेश्वराकडे गेला आणि याहवेहने पर्वतावरून त्याला आवाज देऊन म्हटले, “याकोबाच्या वंशजांना, म्हणजेच इस्राएली लोकांना तू हे सांगावे:
- निर्गम १९:४सुमारे इ.स.पू. १४९१
‘मी इजिप्तच्या लोकांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर माझ्याकडे कसे वाहून आणले, ते तुम्ही स्वतःच पाहिले आहे.
- निर्गम १९:५सुमारे इ.स.पू. १४९१
आता जर तुम्ही पूर्णपणे माझे आज्ञापालन केले आणि माझा करार पाळला, तर सर्व राष्ट्रात तुम्ही माझे मोलवान धन व्हाल. जरी सर्व पृथ्वी माझी आहे,
- निर्गम १९:६सुमारे इ.स.पू. १४९१
तरी तुम्हीच मला याजकीय राज्य; पवित्र राष्ट्र असे व्हाल.’ तू इस्राएली लोकांना सांगावयाच्या याच गोष्टी आहेत.”
- निर्गम १९:७सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मोशेने इस्राएली पुढार्यांना बोलावून ज्यागोष्टी याहवेहने सांगाव्या म्हणून आज्ञापिल्या होत्या, त्या त्यांना सांगितल्या.
- निर्गम १९:८सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा सर्व लोक एकत्र प्रतिसाद देत म्हणाले, “जे काही याहवेहने सांगितले, ते सर्व आम्ही करू.” मग मोशेने जाऊन लोकांचे म्हणणे याहवेहला कळविले.
- निर्गम १९:९सुमारे इ.स.पू. १४९१
मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी घनदाट मेघातून तुझ्याकडे येईन, अशासाठी की मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोक काय म्हणाले ते याहवेहला सांगितले.
- निर्गम १९:१०सुमारे इ.स.पू. १४९१
आणि याहवेह मोशेला म्हणाले, “लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावे,
- निर्गम १९:११सुमारे इ.स.पू. १४९१
आणि तिसर्या दिवशी तयार असावे, कारण त्या दिवशी याहवेह सर्व लोकांसमक्ष सीनाय पर्वतावर उतरून येतील.
- निर्गम १९:१२सुमारे इ.स.पू. १४९१
लोकांसाठी पर्वताच्या सभोवती सीमारेषा आख आणि त्यांना सांग, ‘कोणीही पर्वताकडे जाऊ नये किंवा त्याच्या पायथ्यालाही कोणी स्पर्श करणार नाही, याची काळजी घ्यावी. जे कोणी पर्वताला हात लावतील त्यांना मारून टाकावे.’
- निर्गम १९:१३सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”
- निर्गम १९:१४सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशे पर्वतावरून खाली उतरून लोकांकडे गेला, त्याने त्यांना शुद्ध केले व लोकांनी आपले कपडे धुतले.
- निर्गम १९:१५सुमारे इ.स.पू. १४९१
मग तो लोकांना म्हणाला, “तिसर्या दिवसासाठी आपली तयारी करा, लैंगिक संभोगापासून दूर राहा.”
- निर्गम १९:१६सुमारे इ.स.पू. १४९१
तिसर्या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले.
- निर्गम १९:१७सुमारे इ.स.पू. १४९१
मग मोशेने लोकांना परमेश्वराला भेटण्यासाठी छावणीच्या बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले.
- निर्गम १९:१८सुमारे इ.स.पू. १४९१
सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता.
- निर्गम १९:१९सुमारे इ.स.पू. १४९१
कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.
- निर्गम १९:२०सुमारे इ.स.पू. १४९१
याहवेह सीनाय पर्वतावर उतरले व मोशेला पर्वतावर बोलाविले. मग मोशे वर गेला,
- निर्गम १९:२१सुमारे इ.स.पू. १४९१
आणि याहवेह मोशेला म्हणाले. “खाली जा व लोकांना सांग की याहवेहला पाहण्यासाठी त्यांनी सीमा ओलांडू नये आणि पुष्कळांचा नाश होऊ नये.