मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम १९:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”

  2. निर्गम १९:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा मोशे याहवेहला म्हणाला, “लोक सीनाय पर्वताजवळ येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतःच आम्हाला ताकीद दिली आहे, ‘पर्वताभोवती सीमा आखून आम्ही त्याला पवित्र ठेवावे.’ ”

  3. निर्गम १९:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”

  4. निर्गम १९:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे खाली लोकांकडे गेला व त्यांना हे सर्व सांगितले.

  5. निर्गम २०:१सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि परमेश्वर ही सर्व वचने बोलले:

  6. निर्गम २०:२सुमारे इ.स.पू. १४९१

    “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.

  7. निर्गम २०:३सुमारे इ.स.पू. १४९१

    “माझ्यासमोर तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.”

  8. निर्गम २०:४सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.

  9. निर्गम २०:५सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.

  10. निर्गम २०:६सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  11. निर्गम २०:७सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  12. निर्गम २०:८सुमारे इ.स.पू. १४९१

    शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा.

  13. निर्गम २०:९सुमारे इ.स.पू. १४९१

    सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी.

  14. निर्गम २०:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये.

  15. निर्गम २०:११सुमारे इ.स.पू. १४९१

    कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.

  16. निर्गम २०:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.

  17. निर्गम २०:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही खून करू नका.

  18. निर्गम २०:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही व्यभिचार करू नका.

  19. निर्गम २०:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही चोरी करू नका.

  20. निर्गम २०:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  21. निर्गम २०:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमच्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नका. तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका किंवा त्याच्या दासाचा किंवा दासीचा, किंवा त्याच्या बैलाचा किंवा त्याच्या गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नका.

  22. निर्गम २०:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले

  23. निर्गम २०:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि ते मोशेला म्हणाले, “तुम्ही स्वतः आमच्याशी बोला आणि आम्ही ऐकू. पण परमेश्वराला मात्र आमच्याशी बोलू देऊ नका, नाहीतर आम्ही मरून जाऊ.”

  24. निर्गम २०:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”

  25. निर्गम २०:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    परमेश्वर होते तिथे मोशे दाट अंधकारात गेला असताना, लोक दूर अंतरावर उभे राहिले.