- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Sinai & The Law
God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.
या कालखंडातील वचने
- निर्गम २१:२१सुमारे इ.स.पू. १४९१
पण जर गुलाम एक किंवा दोन दिवसात बरा झाला तर त्यांना पैशाची शिक्षा होणार नाही, कारण गुलाम त्यांच्या मालकीचा आहे.
- निर्गम २१:२२सुमारे इ.स.पू. १४९१
“कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी.
- निर्गम २१:२३सुमारे इ.स.पू. १४९१
परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव,
- निर्गम २१:२४सुमारे इ.स.पू. १४९१
डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,
- निर्गम २१:२५सुमारे इ.स.पू. १४९१
चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी.
- निर्गम २१:२६सुमारे इ.स.पू. १४९१
“एखाद्या धन्याने आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाच्या डोळ्यांवर मारून तो फोडला तर डोळ्याची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.
- निर्गम २१:२७सुमारे इ.स.पू. १४९१
एखादा धनी जो आपल्या गुलाम पुरुष किंवा स्त्रीचा दात पाडतो, तर दाताची भरपाई म्हणून त्याने त्यांना स्वतंत्र करावे.
- निर्गम २१:२८सुमारे इ.स.पू. १४९१
“एखाद्या बैलाने एखाद्या पुरुष किंवा स्त्रीस हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलास धोंडमार करून ठार मारावे व त्याचे मांस खाऊ नये. परंतु बैलाचा मालक निर्दोष असून जबाबदार असणार नाही.
- निर्गम २१:२९सुमारे इ.स.पू. १४९१
पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे.
- निर्गम २१:३०सुमारे इ.स.पू. १४९१
परंतु जर त्याच्याकडून खंडणी मागितली असेल, तर जेवढी रक्कम मागितली ती देऊन तो मालक आपला जीव वाचवू शकतो.
- निर्गम २१:३१सुमारे इ.स.पू. १४९१
एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला बैलाने हुंदडून मारले, तरी हाच नियम लागू व्हावा.
- निर्गम २१:३२सुमारे इ.स.पू. १४९१
पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.
- निर्गम २१:३३सुमारे इ.स.पू. १४९१
“जर कोणी एखादा खड्डा उघडला किंवा खणला व तो झाकला नाही आणि त्यात बैल किंवा गाढव पडले,
- निर्गम २१:३४सुमारे इ.स.पू. १४९१
तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.
- निर्गम २१:३५सुमारे इ.स.पू. १४९१
“जर कोणाच्या बैलाने दुसर्याच्या बैलाला हुंदडून मारले, तर त्या दोघांनी जिवंत असलेला बैल विकून आलेली रक्कम व मेलेला बैल यांचा सारखा वाटा करून घ्यावा.
- निर्गम २१:३६सुमारे इ.स.पू. १४९१
पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे.
- निर्गम २२:१सुमारे इ.स.पू. १४९१
“जर एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले व ते कापले किंवा विकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे परत करावीत.
- निर्गम २२:२सुमारे इ.स.पू. १४९१
“एखादा चोर घरफोडी करताना सापडला व त्याला मारत असताना तो मेला, तर मारणारा रक्तदोषी राहणार नाही.
- निर्गम २२:३सुमारे इ.स.पू. १४९१
पण ते जर सूर्योदय झाल्यावर घडले, तर मारणारा रक्तदोषी ठरेल. “ज्याने चोरी केली त्याने खचितच भरपाई करून द्यावी, पण त्याच्याकडे काहीही नसले, तर त्याला चोरीची भरपाई म्हणून विकून टाकावे.
- निर्गम २२:४सुमारे इ.स.पू. १४९१
त्याने चोरलेले बैल, गाढव किंवा मेंढरू त्याच्याजवळ जिवंत सापडले; तर त्याने त्याची दुपटीने भरपाई करावी.
- निर्गम २२:५सुमारे इ.स.पू. १४९१
“जर कोणी व्यक्ती आपली जनावरे दुसर्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरण्यासाठी मोकळी सोडतो, तर त्याने आपल्या स्वतःच्या शेतातील व द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम पीक देऊन भरपाई करावी.
- निर्गम २२:६सुमारे इ.स.पू. १४९१
“कोणी जर विस्तव पेटविले आणि चुकून तो काट्यांच्या झुडूपात पसरून दुसर्याच्या धान्याची कोठारे किंवा उभे पीक किंवा संपूर्ण शेत जळून जाते, तर ज्याने विस्तव पेटविले त्याने नुकसान भरपाई करून द्यावी.
- निर्गम २२:७सुमारे इ.स.पू. १४९१
“जर कोणी चांदी किंवा सामान सुरक्षित राहावे म्हणून आपल्या शेजार्याकडे ठेवले आणि त्याची चोरी झाली, जर चोराला पकडले तर त्या चोराने त्या सामानाची दुप्पट भरपाई करून द्यावी.
- निर्गम २२:८सुमारे इ.स.पू. १४९१
पण जर चोर सापडला नाही तर घरमालकाने न्यायाधीशासमोर हजर व्हावे आणि शेजार्याच्या सामानावर त्याने हात टाकला नाही हे सिद्ध करावे.
- निर्गम २२:९सुमारे इ.स.पू. १४९१
एखादे बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा एखादी हरवलेली वस्तू असे काहीही असो, ज्याबद्दल कोणी कलहाने बेकायदेशीरपणे म्हणतो की, ‘हे माझे आहे,’ तर त्या दोघांचाही वाद न्यायाधीशासमोर आणावा. ज्या कोणाला न्यायाधीश दोषी ठरवेल त्याने दुसर्याला दुपटीने परत करावे.