मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Sinai & The Law

God meets Israel at Mount Sinai, reveals the Ten Commandments, and establishes the Tabernacle and the priestly covenant.

1,657 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. निर्गम २३:४सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुमच्या वैर्‍याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे.

  2. निर्गम २३:५सुमारे इ.स.पू. १४९१

    जे तुमचा द्वेष करतात त्यांचे गाढव ओझ्याखाली पडलेले तुम्हाला दिसले, ते तसेच सोडू नये; त्यांना अवश्य मदत करावी.

  3. निर्गम २३:६सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुमच्यातील गरिबांच्या न्यायवादात त्यांचा न्याय नाकारला जाऊ नये.

  4. निर्गम २३:७सुमारे इ.स.पू. १४९१

    खोट्या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि निरपराधी किंवा प्रामाणिक व्यक्तीला मरणदंड देऊ नये, कारण मी दोषी व्यक्तीला सोडणार नाही.

  5. निर्गम २३:८सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते.

  6. निर्गम २३:९सुमारे इ.स.पू. १४९१

    “परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.

  7. निर्गम २३:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    “सहा वर्षे आपल्या भूमीत तुम्ही पेरणी करावी आणि पीक गोळा करावे,

  8. निर्गम २३:११सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु सातव्या वर्षी जमीन नांगरू नये आणि न वापरता तशीच पडीक राहू द्यावी. मग तुमच्यातील गरीब लोकांना त्यातील अन्न मिळेल आणि त्यातूनही उरलेले वनपशू खातील. तुमचे द्राक्षमळे व जैतुनाच्या बागांविषयी सुद्धा असेच करावे.

  9. निर्गम २३:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    “सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.

  10. निर्गम २३:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    “जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये.

  11. निर्गम २३:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    “वर्षातून तीन वेळा तुम्ही माझ्यासाठी सण पाळावेत.

  12. निर्गम २३:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    “बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला. “माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये.

  13. निर्गम २३:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    “जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात पेरलेल्या पिकाचा हंगाम करता, तेव्हा त्याच्या प्रथमफळाने हंगामाचा सण पाळावा. “वर्षाच्या शेवटी आपल्या शेतातून तुम्ही हंगाम गोळा करता, तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.

  14. निर्गम २३:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    “वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह यांच्यासमोर हजर व्हावे.

  15. निर्गम २३:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    “अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये. “मला अर्पण केलेल्या यज्ञपशूंची चरबी सकाळपर्यंत राहू देऊ नये.

  16. निर्गम २३:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा. “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.

  17. निर्गम २३:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    “पाहा, मार्गात तुझे रक्षण करावे व जो देश मी तुमच्यासाठी तयार करून ठेवला आहे, त्यात तुम्हाला घेऊन यावे म्हणून तुमच्यापुढे मी एक दूत पाठवित आहे.

  18. निर्गम २३:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    त्याच्यापुढे सावध असा आणि तो जे काही सांगेल ते ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका; तो तुझ्या अपराधांची क्षमा करणार नाही, कारण माझे नाव त्याच्यामध्ये आहे.

  19. निर्गम २३:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    जर तुम्ही काळजीपूर्वक त्याचे ऐकाल आणि मी जे सांगतो ते कराल, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू होईन आणि जे तुमचा विरोध करतात, त्यांचा मी विरोधक होईन.

  20. निर्गम २३:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    माझा दूत तुमच्यापुढे जाईल आणि तुम्हाला अमोरी, हिथी, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात पोहचवेल आणि मी त्या सर्वांचा नाश करेन.

  21. निर्गम २३:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यांच्या दैवतांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये किंवा त्यांच्या चालीरीतींचे अनुसरण करू नये. तुम्ही त्या मोडून टाकाव्यात आणि त्यांच्या पवित्र दगडांचा चुरा करावा.

  22. निर्गम २३:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन,

  23. निर्गम २३:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही, ना कोणी वांझ राहणार. तुमचा जीवनकाळ मी पूर्ण करेन.

  24. निर्गम २३:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    “तुम्ही जो देश जिंकून घ्याल त्यात मी आपले भय पाठवेन व त्यात गोंधळ निर्माण करेन. तुमचे शत्रू पाठ दाखवून पळ काढतील असे मी करेन.

  25. निर्गम २३:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    हिव्वी, कनानी, हिथी या लोकांनी तुमच्या मार्गातून बाजूला व्हावे म्हणून मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवेन.